नागपूरकरांनो सावधान! सायबर गुन्ह्यांमध्ये 2019 च्या तुलनेत 75 टक्क्यांनी वाढ

नागपूर शहरात वाढते सायबर गुन्हे कमी करण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर आहे. (Nagpur Cyber Crime Cases Increase)

नागपूरकरांनो सावधान! सायबर गुन्ह्यांमध्ये 2019 च्या तुलनेत 75 टक्क्यांनी वाढ
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 10:31 AM

नागपूर : वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे क्राईम सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात सायबर गुन्ह्यांचं प्रमाणंही वाढलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपुरात सायबर गुन्ह्यांमध्ये 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे. माहिती अधिकार कायद्यातंर्गत हे धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे. (Nagpur Cyber Crime Cases Increase)

यात बॅकिंग फ्रॅाड, ॲानलाईन चिटींग, फेसबुकवरुन मैत्री, ब्लॅकमेलिंग, आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. नागपूर शहरात वाढते सायबर गुन्हे कमी करण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर आहे.

नागपुरात 2019 च्या तुलनेत सायबर गुन्ह्यांमध्ये 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात इंटरनेटवरुन आर्थिक फसवणूक, लॉकडाऊनमध्ये कोरोनाची अफवा आणि ऑनलाईन बँकिंग फसवणुकीचे मोठे प्रमाण आहे. नागपुरात लॉकडाऊनमध्ये कोरोनाची अफवा पसरवल्या प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तर फेसबुकवरील मैत्री करुन 13 जणांची फसवणूक करण्यात आली आहे. (Nagpur Cyber Crime Cases Increase)

नागपुरात ॲानलाईन चिटिंगचे 13 गुन्हे दाखल झाले आहेत. तर ॲानलाईन बॅकिंग, ओटीपी फसवणूक याबाबतचे 18 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच इतर सायबर गुन्ह्यांची संख्या 50 च्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या फिशिंग ट्रॅपमध्ये सुशिक्षितांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे.

विदेशी टोळ्याही सक्रीय 

आरबीआय किंवा बॅंकेच्या नावाने फेक मेल करणे, या मेलद्वारे शेकडो कोटी रुपयांचं आमिष दाखवणे, जे लोक अशाप्रकारच्या मेलला रिप्लाय करतात, या सावजांना हेरुन त्यांना ॲानलाईन गंडा घालण्याचे प्रकार सध्या वाढत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यात विदेशी टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत.

सायबर गुन्हेगारीत आर्थिक फसवणूकीसोबतच, इतर फसवणूकीचे प्रमाणंही वाढत आहेत. आधी फेसबुकवर फ्रेंडशिप रिक्वेस्ट, नंतर मैत्री, चॅटिंग, प्रेम, लग्नाचं आश्वासन, नंतर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग…. असा धक्कादायक प्रकार नागपुरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका 32 वर्षी तरुणीसोबत घडला आहे. या प्रकरणानंतर सायबरच्या युगात वावरताना काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

इंटरनेट हे आपल्या जीवनातील अविभाज्य अंग आहे. खरेदीपासून, ते जीवनसाथी शोधणे, कार्यालयीन काम, आर्थिक व्यवहार ते शिक्षण… अशा अनेक कामांसाठी आपण इंटरनेटचा वापर करतो. पण याच इंटरनेटच्या माध्यमातून घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांचं प्रमाणंही वाढलं आहे. त्यामुळे ॲानलाईनच्या विश्वात वावरताना, फसवणूक होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे.(Nagpur Cyber Crime Cases Increase)

संबंधित बातम्या : 

नागपूरचे महापौर संदीप जोशी राजीनामा देण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात खळबळ

अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली बिल्डरांकडून 8 कोटी उकळले, डोंबिवलीत चौघांवर खंडणीचा गुन्हा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.