पत्नीने पोलिसात तक्रार केल्याचा राग, नागपुरात वडिलांकडून चिमुकलीची हत्या

राधिका किशोर सयाम असं मृत्युमुखी पडलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीचं नाव आहे. (Nagpur Father Killed Daughter)

पत्नीने पोलिसात तक्रार केल्याचा राग, नागपुरात वडिलांकडून चिमुकलीची हत्या
डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. औरंगाबादच्या पदमपुरा कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 7:43 AM

नागपूर : वडिलांनी चिमुकलीची ब्लेडने गळा चिरुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर समोर आला आहे. पतीसोबत झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी पत्नी पोलिसात गेली असताना वडिलांनी मुलीची हत्या केली. दोन वर्षांच्या चिमुकलीचा करुण अंत झाला. नागपुरात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Nagpur Father Killed Daughter after fight with wife)

नागपुरात राहणाऱ्या सयाम दाम्पत्यामध्ये काही कारणाने वाद झाला. या वादाची तक्रार देण्यासाठी पत्नी पोलीस स्टेशनला गेली होती. त्याचा राग आल्यामुळे पतीने चिमुकलीची हत्या केल्याचा आरोप आहे. राधिका किशोर सयाम असं मृत्युमुखी पडलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीचं नाव आहे.

नागपूर जिल्ह्यातील गणेशपूर गावात ही धक्कादायक घटना घडली. बुट्टीबोरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

गोंदियात बापाने चिमुकलीला संपवलं

खाऊसाठी पाच रुपये मागितल्याने वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या महिन्यात गोंदियात घडला होता. जन्मदात्याने 20 महिन्यांच्या मुलीचा दरवाजावर आपटून जीव घेतला. आरोपी पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

नेमकं काय घडलं?

28 वर्षीय विवेक उईके हा तरुण संध्याकाळी कामावरुन घरी परत आला. त्यावेळी त्याची पावणेदोन वर्षांची मुलगी वैष्णवी रडत होती. विवेकची पत्नी अर्थात चिमुकलीची आई वर्षा उईके हिने मुलीला खाऊ घेऊन देण्यासाठी पतीकडे पाच रुपये मागितले. त्यामुळे विवेकच्या संतापाचा पारा चढला. रागाच्या भरात त्याने मुलीला उचललं आणि घरातील दरवाजावर जोराने आपटलं.

आईची तक्रार, पित्याला अटक

वैष्णवीच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केलं. त्यानंतर आईने तिरोडा पोलीस स्थानकात पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पिता विवेक उईके याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध मुलीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

समलैंगिक संबंधातून क्षुल्लक वाद, पुण्यात मित्राने मित्राला संपवलं

रडणाऱ्या चिमुकलीसाठी आईने पाच रुपये मागितले, बापाने दरवाजावर आपटल्याने मुलीचा मृत्यू

(Nagpur Father Killed Daughter after fight with wife)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.