Nagpur Crime: अभियंता असलेल्या मुलाकडून आईची हत्या; स्वतःही केली आत्महत्या; कुजलेल्या अवस्थेत मिळाले मृतदेह

उच्चशिक्षित असलेल्या मुलाकडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना पाच दिवसापूर्वी घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण दोन्हीही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत, मात्र आत्महत्या करण्यामागचे कारण अजून समजले नाही.

Nagpur Crime: अभियंता असलेल्या मुलाकडून आईची हत्या; स्वतःही केली आत्महत्या; कुजलेल्या अवस्थेत मिळाले मृतदेह
लखनऊमध्ये दारुड्या बापाकडून स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 6:08 PM

नागपूरः नागपूरच्या हिंदुस्थान कॉलनीमध्ये (Nagpur Hindustan Colney) जन्मदात्या आईचा खून (Mother Murder) करून स्वतः इंजिनिअर असलेल्या मुलाने विष पिऊन आत्महत्या (Son Suicide) केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. मात्र घरात दोघंच राहत असल्याने या घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. ज्या आईनं आपल्या मुलाला जन्म दिला त्याचं पालन पोषण केलं, ज्याला इंजिनीअर बनविल त्याच मुलाने मात्र आईवर चाकूने वार करुन हत्या केली. आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना नागपूरच्या हिंदुस्तान कॉलनीमध्ये घडली.

घरात आई मुलगा दोघेच

श्रीनिवास विष्णू चोपडे (वय 51) असे त्या मुलाचे नाव असून लीला विष्णू चोपडे (वय 75) असे त्याच्या आईचे नाव आहे. नागपुरातील हिंदुस्तान कॉलनीमध्ये असलेल्या या मोठ्या घरात श्रीनिवास आपल्या आईसोबत राहत होता. श्रीनिवास हा इंजिनीअर असून त्याने लग्न केलेले नव्हते, तो नोकरीसुद्धा करत नव्हता. इतक्या मोठ्या घरात दोघेच मायलेक राहत होते.

चार दिवसांपासून संपर्क नाही

गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे आणि मोबाईल बंद असल्यामुळे नातेवाईकांनी त्याच्या घरी धाव घेतली. त्यावेळी सर्व बाजूंनी आतमधून कुलूप लावलेले असल्यामुळे नातेवाईकांचा संशय बळावला. त्यानंतर नातेवाइकांनी धंतोली पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी दरवाजा तोडला

धंतोली पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर घर आतून कुलूप बंद असल्यामुळे मुख्य दरवाजा तोडण्यात आला आहे. त्यानंतर बेडरूममध्ये पोलीस गेल्यावर जे चित्र पोलिसांना दिसल ते थरकाप उडवणार होत.

दोन्हीही मृतदेह कुजलेले

नागपूरच्या धंतोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवास आणि त्याच्या आईचा मृतदेह हा चार ते पाच दिवस पूर्वीचा असून कुजलेल्या अवस्थेत बेडरूममध्ये आढळून आला. श्रीनिवासने आत्मघातकी पाऊल का उचलले याचा पोलीस तपास करत असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.