Nagpur : धावत्या ट्रेनमधून प्रवास करताना सावधान, मध्यरात्री त्याने… बोंबाबोंब करताच… काय घडलं नेमकं?
धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ट्रेनमधील कोच अटेंडंटने हे दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र बालिकेच्या सुदैवाने तो अपयशी ठरला. तिने आरडा ओरडा केल्यामुळे आजूबाजूचे प्रवासी सावध झाले आणि..
नागपूर | 17 जानेवारी 2024 : नागपूरमध्ये सध्या कडाक्याच्या थंडीचा मौसम आहे. मात्र याच नागपूरवासीयांसाठी एका धक्कादायक बातमी आहे. धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ट्रेनमधील कोच अटेंडंटने हे दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र बालिकेच्या सुदैवाने तो अपयशी ठरला. तिने आरडा ओरडा केल्यामुळे आजूबाजूचे प्रवासी सावध झाले आणि संतप्त प्रवाशांनी त्या कोच अटेंडंटची बेदम धुलाई केली. आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. मोहम्मद मुन्ना (वय 50) असे आरोपीचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.
कोच अटेंडंटकडून अश्लील चाळ करण्याचा प्रयत्न
सोमवारी मध्यरात्री बंगलोर पाटणा पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. आरोपी हा बिहारचा रहिवासी असून गेल्या आठ दिवसांपासून तो रेल्वेत कोच अटेंडन्स म्हणून काम करतो . पाटण्याच्या दिशेने निघालेली ही ट्रेन मध्यरात्रीच्या दरम्यान नागपूर जवळील बुट्टीबोरी जवळ आली. या ट्रेनमधून प्रवास करणारी 9 वर्षीय बालिका रात्रीच्या सुमारास वॉशरूममध्ये जात होती. तेव्हा कोचच्या बाहेर बसलेल्या आरोपीने तिला पाहिले.
मुलगी एकटी असल्याचं पाहून त्याने डाव साधण्याचा प्रयत्न केला. ती मुलगी बाथरूममध्ये गेल्यावर आरोपीने धक्का मारून बाथरूममध्ये प्रवेश केला आणि घाबरलेल्या त्या मुलीशी अश्लील चाळे सुरू केले. ती आणखनीच भेदरली., पण तिने कशीबशी हिंमत गोळा केली आणि दार उघडून बाहेर पळ काढला.
प्रवाशांनी केली धुलाई
बाहेर आल्यावर तिने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून गाढ झोपलेले प्रवासी खाडकन जागे झाले आणि त्यांनी बाहेर धाव घेतली. त्या अल्पवयीन मुलीकडून सर्व प्रकार समजल्यावर प्रवासी संतापले आणि त्यांनी आरोपी मोहम्मद मुन्ना याला पकडन चांगलाच चोप दिला. काही वेळाने गाडी नागपूर स्थानकात पोहोचल्यानंतप प्रवाशांनी आरोपीला आरपीएफच्या ताब्यात दिलं.लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. मात्र या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.