Nagpur Crime : सलूनच्या आडून करायचे ‘नको ते धंदे’, डमी ग्राहक पाठवल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

नागपूरमध्ये वर्धा रोडवरील एक सलूनमध्ये धक्कादायक प्रकार सुरू होता. डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी तेथे धाड टाकल्यावर हे गैरकृत्य समोर आले. तेथून एका अल्पवयीन मुलीचीही सुटका करण्यात आली.

Nagpur Crime : सलूनच्या आडून करायचे 'नको ते धंदे', डमी ग्राहक पाठवल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 4:15 PM

सुनील ढगे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 19 ऑक्टोबर 2023 : नागपूररमधून (nagpur) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सलूनच्या नावाआड काहीजण नको ते धंदे करत (crime news) असल्याचे उघड झाले आहे. तेथे सुरू असलेल्या देह व्यापाऱ्याचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. या देहव्यापार प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तसेच धाड टाकून एका अल्पवयीन मुलीची सुटका देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

वर्धा रोडवरील एका सलूनमध्ये बराच काळ हा गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दीपक मदन कटवते ( रा सिव्हील लाईन) आणि प्रवीण रामभाऊ ( रा. बोरगाव रोड) कान्होलकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे.

डमी ग्राहकांच्या मदतीने रचला सापळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ही धाड घालण्यात आली. शहरातील वर्धा रोडवरील स्वामी विवेकानंद चौकात, ॲक्सिस बँकेच्या बाजूला हेअर डीवाईन हे युनिसेक्स सलून आहे. तेथे सलूनच्या नावाखाली देहव्यापार चालतो, अशी माहिती खबऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट एकला दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचत डमी ग्राहक पाठवून तेथे चाचपणी केली. तेथून कन्फर्मेशन येताच पोलिस अधिकाऱ्यांनी सलूनवर धाड टाकली.

तेथे पोलिसांनी दीपक मदन कटवते ( रा सिव्हील लाईन) आणि प्रवीण रामभाऊ ( रा. बोरगाव रोड) या दोन आरोपींना अटक केली. तेथे एक १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी देखील होती. दोघेही आरोपी गरीब घरातील मुलींना पैशांचं आमिष दाखवून त्यांना देहव्यापारात ढकलत होते, तसेच देह व्यापारासाठी जागा उपलब्ध करून द्यायचे अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. सलूनवर धाड टाकल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकत अटक केली. याप्रकरणी त्यांची पुढील चौकशी सुरू आहे. तर त्या पीडित अल्पवयीन मुलीला महिला बालसुधारगृहात पाठवले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यापूर्वीही नागपूरमधून स्पाच्या आडून सुरू असलेल्या देह व्यापाराचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला होता. सदर हा परिसर येथे स्पाच्या आडून देह व्यापाराचा सर्रास धंदा सुरू होता. वेगवेगळ्या राज्यातील युवती आणि महिलांना आमिष दाखवून या ठिकाणी आणलं जायचं आणि त्यांच्याकडून देह व्यापार करून घेतला जायचा. पोलिसांनी तेथे धाड टाकून कारवाई केली होती.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.