केअर टेकरने सोन्याचे दागिने लांबवले, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा नागपूर-दिल्ली- फरिदाबाद प्रवास

नागपूर पोलिसांनी सोन्याचे दागिन्याची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Nagpur Police arrested accused)

केअर टेकरने सोन्याचे दागिने लांबवले, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा नागपूर-दिल्ली- फरिदाबाद प्रवास
Nagpur Police
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 3:53 PM

नागपूर : नागपूरच्या गिट्टीखदान पोलिसांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेची चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील फरिदाबादमधील घरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच अटक करण्यात आरोपीकडून दागिने परत मिळवण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. (Nagpur Police arrested  accused for stealing gold jewellery and cash)

केअर टेकरकडून चोरी 

नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहित सिंग नावाचे गृहस्थ राहतात. रोहितकडे काही दिवसांपूर्वी दिल्लीतील नातेवाईक राहण्यासाठी आले होता. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा केअर टेकरही होता. त्यावेळी त्या केअर टेकरने संधी साधत त्या घरात चोरी केली.

आरोपीला पकडण्यासाठी नागपूर-दिल्ली- फरिदाबाद प्रवास 

यावेळी त्याने राहत्या घरातील 5 तोळ्याच्या सोन्याच्या चार बांगड्या आणि 8 हजार रुपयांची चोरी केली. काही दिवसानंतर घरात राहणाऱ्या व्यक्तींना चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा गिट्टीखदान पोलीस स्टेशनने तपास सुरु केला. मात्र पोलिसांनी ही चोरी नेमकी कशी झाली याचा काही पुरावा मिळत नव्हता. पोलिसांना पुरावा मिळाल्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठली. यानंतर केअर टेकर भावेश दुबेला ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने चोरीची कबूली दिली.

यानंतर चोरी केलेल्या सोन्याच्या बांगड्या त्याच्या मूळ गावी फरिदाबाद येथील घरी असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी फरिदाबाद येथे जाऊन त्या बांगड्या हस्तगत केला. तसेच त्याला अटक करुन नागपुरात आणण्यात आलं. दरम्यान पोलिसांनी एखाद्या गुन्ह्याचा छडा लावायचं मनावर घेतलं तर ते चोराला कशाही पद्धतीने पकडू शकतात. हे यातून सिद्ध झालं आहे.  (Nagpur Police arrested  accused for stealing gold jewellery and cash)

संबंधित बातम्या : 

पोलीस भरतीचं आमिष दाखवत तोतया पोलिसाचा विवाहित महिलेवर अत्याचार आणि फसवणूक

गल्लीतला दादा ते कुख्यात डॉन, सोलापूर पोलीस आयुक्तांकडून गुंडांची यादी, ‘चुन चुन के’ कारवाई

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...