नागपूरकरांनो होळीला रस्त्यावर गोंधळ घालाल तर याद राखा, खावी लागेल तुरुंगाची हवा; पोलीस ॲक्शन मोडवर
होळीच्या (holi) उत्सवात अनेक गुन्हे घडतात. त्यामध्ये अनेक वर्षात नागपूर अग्रेसर राहिले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर पोलिसांनी (nagpur police) रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.
नागपूर – होळीच्या (holi) उत्सवात अनेक गुन्हे घडतात. त्यामध्ये अनेक वर्षात नागपूर अग्रेसर राहिले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर पोलिसांनी (nagpur police) रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. होळीच्या निमित्ताने सण साजरा करीत असताना अनेकजण रस्त्यावर गोंधळ घालत असतात. त्यामुळे वाहतुकीचा मोठी अडचण निर्माण होत असते. परंतु यंदाची होळी अत्यंत शांततेत व्हावी यासाठी नागपूर पोलिस तयारीत आहे. विशेष म्हणजे यंदा 15 वर्षानंतर होळी आणि मुस्लिम बांधवांचा सण शब्बे बारात एकाच दिवशी आल्याने नागपूर पोलिसांना टेन्शन वाढलं आहे. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे. नागपूर शहरासह ग्रामीण भागात अनेक गुन्हे उघडकीस येत असतात. त्यामुळे पोलिसांचे टेन्शन कमी करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांची साथ मिळावी. यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार (amiteshkumar) यांनी नागपुरात शांतता समितीची बैठक आयोजीत केली होती.
बैठकीला सर्वधर्मीय नेते उपस्थित
होळी आणि शब्बे बारात सण नागपूरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काळजी घेतली आहे. नागपूर शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डीसीपी,एसीपी तसेच सर्वधर्मीय नेत्यांमध्ये एक बैठक झाली आहे. ही बैठक दोन्ही सण शांततेत व्हावेत यासाठी होती. तसेच कोणीही रस्त्यावर गोंधळ घातला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात एकही हत्या नाही
नागपूर शहरात आणि ग्रामीण भागात हत्येचं सत्र कायम सुरू असतं. फेब्रुवारी महिन्यात एकही गुन्हा नोंद झालेला नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचबरोबर मार्च महिन्यात देखील आत्तापर्यंत हत्येचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. उत्सवादरम्यान कोणताही गुन्हा नोंद होऊ यासाठी पोलिस आयुक्तालयात नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की, होळी सणाच्या दिवशी जर कोणतीही व्यक्ती रस्त्यावर गोंधळ घालून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल तर त्याला सरळ तुरुंगाची हवा खावी लागेल.