Holi 2023 : होळीत रंगाचे फुगे मारल्यास पोलिस करणार कारवाई, या शहरात 4 हजार पोलिस तैनात करणार

| Updated on: Mar 04, 2023 | 10:48 AM

नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या रूट मार्चचे आयोजन नागपूर पोलिसांनी केले. या रूटमार्चमध्ये दोन पोलीस निरीक्षक, 9 पोलीस उपनिरीक्षक 125 महिला, पुरुष अंबलदार सहभागी होते.

Holi 2023 : होळीत रंगाचे फुगे मारल्यास पोलिस करणार कारवाई, या शहरात 4 हजार पोलिस तैनात करणार
police
Image Credit source: tv9marathi
Follow us on

गजानन उमाटे, नागपूर : होळीत धुळवड (holi 2023) साजरी करताना रंग भरलेले फुगे मारले जातात. पण नागपूरात यंदाच्या धुळवडीत रंग भरलेले फुगे फेकून मारल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Nagpur Police Commissioner Amitesh Kumar) यांनी ही माहिती दिली आहे. होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्‍वभूमीवर कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलीस ॲक्शन मोडवर आहे. शहरातील 60 संवेदनशील ठिकाणी पोलीस कोबिंग ॲापरेशन राबवणार आहे. शहरात 6 ते 8 मार्चदरम्यान 40 ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर होळीच्या पार्श्‍वभूमीवर दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांवरती सुध्दा मोठी कारवाई करण्यात येणार आहे. शाळकरी मुला-मुलींचे वसतिगृह, महिलांच्या वसतिगृहाजवळ पोलिसांचे फिक्स पॉईंट लावून पोलिस गस्त घालणार (police patrol) असल्याची माहिती नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

नागपूर शहरात पोलीसांचा रुट मार्च

होळी आणि शबे बारात उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस अलर्ट मोडवर आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम रहावा, यासाठी नागपूर पोलिसांनी ठिकठिकाणी रुटमार्च काढला आहे. सण उत्सव शांततेत पार पडावे, यासाठी नागपूर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. कायदा पालन करणाऱ्या जबाबदार नागरिकांना संरक्षण व्हावे, गुन्हेगारांच्या मनात भिती निर्माण व्हावी. सर्वसामान्य जनतेमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण होऊन सुरक्षातेची भावना निर्माण व्हावी. या व इतर आवश्यक उद्देशाने रूट मार्च आयोजन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

रूट मार्चला नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमारांचं मार्गदर्शन

नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या रूट मार्चचे आयोजन नागपूर पोलिसांनी केले. या रूटमार्चमध्ये दोन पोलीस निरीक्षक, 9 पोलीस उपनिरीक्षक 125 महिला, पुरुष अंबलदार सहभागी होते. रूट मार्चची सुरुवात बजाज नगर पोलीस स्टेशन हद्दीतील काचीपुरा चौक, शंकर नगर ,चामडीया वस्ती ,बजाज नगर राणा प्रताप नगर हद्दीतील सुभाष नगर ,आयटी पार्क, तुकडोजी नगर बिरसा मुंडा चौक, पोलीस ठाणे सोनेगाव येथील सोनेगाव वस्ती रेहतमानगर, एचडी स्टेट राहुल नगर, सोमल वाडा परिसर सुमारे 15 किलोमीटर फिरून समारोप करण्यात आला.