आम्ही राहायचं कुठे? प्रॉपर्टीच्या वाद विकोपाला, मुलाकडून वडिलांची हत्या

प्रॉपर्टीच्या वादातून जन्मदात्या मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Nagpur Son killed Father due to property issue) 

आम्ही राहायचं कुठे? प्रॉपर्टीच्या वाद विकोपाला, मुलाकडून वडिलांची हत्या
क्राईम
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 8:24 PM

नागपूर : प्रॉपर्टीच्या वादातून जन्मदात्या मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या गणेश नगर पोलीस स्टेशन हद्दीतील मोहमद अली चौकात ही घटना घडली. युसूफ शेख असं मृत व्यक्तीचे नाव आहे. तर अनिस शेख असे आरोपी मुलाचे नाव आहे. (Nagpur Son killed Father due to property issue)

मिळालेल्या माहितीनुसार, अनिस हा आपल्या वडिलांसोबत एकाच घरात राहत होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांनी राहते घर शेजाऱ्याला विकून टाकले. यानंतर शेजाऱ्याकडून घर खाली करुन देण्यास तगादा लावला होता. यावरुन गेल्या  काही दिवसांपासून बाप-लेकामध्ये वाद सुरु होते. तुम्ही घरं विकलं, मग आम्ही राहायचं कुठे? असा प्रश्न त्याने वडिलांना विचारला.

मात्र आज सकाळी 11 च्या सुमारास तो वाद चांगलाच विकोपाला गेला. यानंतर मुलाने रागाच्या भरात लोखंडी रॉडने वडिलांच्या डोक्यावर वार केला. हा वार इतका जबरदस्त होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेच्या वेळी त्या मुलाची पत्नी, आई , मुलगी सगळेच घरी होते. मात्र कोणालाही एवढी मोठी घटना घडेल, असे वाटले नव्हते. वडिलांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच मुलाने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली.

एकत्र कुटुंबात राहणारा हा परिवार असला तरी संपत्तीचा वाद पुढे आला.  ज्या पित्याने आपल्या पुत्राला जन्माला घातलं त्यानेच त्याची हत्या केली. यामुळे धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या निमित्ताने संपत्तीचा लोभ माणसाला कुठल्या थराला पोहचवेल हे पुढे आलं आहे.  (Nagpur Son killed Father due to property issue)

संबंधित बातम्या : 

पोलिसांसमोरच तरुणावर प्राणघातक हल्ला, कळवा पोलिसांकडून तिघांना अटक

जेलमध्ये नग्न होऊन धिंगाणा, सातारा पोलिसांना मारण्याचा प्रयत्न, गांजाप्रकरणातील परदेशींचा राडा

खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईडमध्ये भाजपच्या माजी आमदाराचं नाव, सचिन सावंत यांचा गौप्यस्फोट

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.