आईचे छत्र हरपले; अल्पवयीन बहिणींनी असा काय गुन्हा केला की जन्मदात्या पित्यानेही प्रेमाला पारखे केले !

आरोपी व्यवसायाने रिक्षाचालक असून, त्याची पत्नी गर्भवती असताना 2019 रोजी मध्ये मरण पावली. त्यावेळी त्याची मोठी मुलगी 14 वर्षे, तर लहान मुलगी 12 वर्षे वयाची होती. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने दोन्ही मुलींवर वाईट नजर टाकायला सुरुवात केली.

आईचे छत्र हरपले; अल्पवयीन बहिणींनी असा काय गुन्हा केला की जन्मदात्या पित्यानेही प्रेमाला पारखे केले !
अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी बापाला जन्मठेपImage Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 2:36 PM

नागपूर / सुनील ढगे : अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधम बापाला नागपूर विशेष सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी बापाने बायकोच्या निधनानंतर स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलींवर दीड वर्ष बलात्कार केला. मुलीवर बलात्कार करुन कुठे याची वाच्छता केल्यास ठार मारण्याची धमकी द्यायचा. अखेर याप्रकरणी मुलींनी मामाला सांगितल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यानंतर मुलींनी मामासोबत तहसिल पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत खटला दाखल केला.

आईच्या मृत्यूनंतर बापाची मुलींवर वाईट नजर

आरोपी व्यवसायाने रिक्षाचालक असून, त्याची पत्नी गर्भवती असताना 2019 रोजी मध्ये मरण पावली. त्यावेळी त्याची मोठी मुलगी 14 वर्षे, तर लहान मुलगी 12 वर्षे वयाची होती. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने दोन्ही मुलींवर वाईट नजर टाकायला सुरुवात केली. दोन्ही मुलींवर वारंवार बलात्कार केला. याबाबत कुठेही सांगितल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुली सुद्धा काही बोलत नव्हत्या.

मुलींनी मामाला सांगितल्यानंतर घटना उघडकीस

मात्र त्या काही दिवस मामाकडे राहायला गेल्या होत्या. त्यानंतर परत वडिलांकडे जाण्याची त्यांची तयारी नव्हती. तेव्हा मामाने कारण विचारल्यानंतर मुलींनी सगळं मामाला सांगितलं. यानंतर मामाने मुलींना घेऊन थेट तहसिल पोलीस ठाणे गाठले आणि नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली. नागपुरातील मोमीनपुरा भागात ही घटना घडली.

हे सुद्धा वाचा

न्यायालयाकडून नराधम बापाला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला गुरुवारी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. आरोपीला लैंगिक अपराधांपासून बालसंरक्षण अधिनियमातील कलम 4 (2) व कलम 6 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय त्याला अन्य काही कलमांतर्गत वेगवेगळ्या कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व शिक्षा त्याला एकत्र भोगायच्या आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.