मुंबई हादरली! महिलेचे केस पकडले, तोडं दाबलं, चाकू लावत बंदखोलीत नेत दोघांकडून बलात्कार, धक्कादायक घटना

Nalasopara crime News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज काहीना काही अत्याचाराच्या बातम्या कानावरव पडत आहेत. अशातच मुंबईमधूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबई हादरली! महिलेचे केस पकडले, तोडं दाबलं, चाकू लावत बंदखोलीत नेत दोघांकडून बलात्कार, धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 5:35 PM

राज्यात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. रोज राज्यातून महिला, तरूणी आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशातच आणखीन एक धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. 32 वर्षीय महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घडना घडलीय. आपल्या मुलाला बोलवण्यासाठी गेलेल्या महिलेला दोन नराधमांनी पकडून नेत बंद खोलीमध्ये नेत अतिप्रंसग केला. नालासोपाऱ्यातील संतोष भवन येथे ही घटना घडली आहे.

10 सप्टेंबरला रात्री नऊ वाजता 32 वर्षीय पीडित महिला आपल्या मुलाला बोलावण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपी जितेंद्र यादव याने महिलेचे केस ओढले आणि तोंड दाबलं. गल्लीमधील एका रूममध्ये महिलेला नेलं. बंद खोलीमध्ये दुसरा आरोपी अवी जयस्वाल याने महिलेला चाकू दाखवत बलात्कार केला. दोन्ही आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. याबद्दल कोणालाही काही सांगितलं तर जीवे मारण्याचीही धमकी दोन्ही आरोपी नराधमांनी दिली. शेवटी शनिवारी पीडित महिलेने तुळींज पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली आहेत. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. य घटनेने नालासोपाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाचा आरोपींना काहीही धाक राहिलेला नाही.  आरोपींचे पीडित महिलेसोबत भांडण झाल्याची माहिती समजत असून याबाबतही पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, राज्यात सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. महिलांसाठी राज्यात लारकी बहीण योजनाही सुरू करण्यात आली आहे. महिलांना महिन्याला १५०० रूपये मदत दिली जात आहे. मात्र महिलांच्या सुरक्षेचं काय? आरोपींना कठोरात कठोर शिक्षा केली गेली पाहिजे.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.