Nanded Drown : तराफे वाचवण्याच्या नादात 17 वर्षीय तरुणाने गमावला जीव! नांदेडमध्ये कयादू नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

Nanded Crime News : तराफे वाचवण्यासाठी राजूने पाण्यात उतरून ते लपवून ठेवण्यासाठी दुसऱ्या बाजूला पोहत जाण्याचा प्रयत्न केला. पण पोहताना त्याचा पाय अडकून बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

Nanded Drown : तराफे वाचवण्याच्या नादात 17 वर्षीय तरुणाने गमावला जीव! नांदेडमध्ये कयादू नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
तरुणाचा बुडून मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 8:09 AM

नांदेड : नांदेड (Nanded News) जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात एका 17 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. तराफे वाचवण्याच्या नादात या तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला. या 17 वर्षाय तरुणाचं नाव राजू चव्हाण (Raju Chavhan) आहे. गा घटना हदगावच्या उंचाडा येथील कयादू नदीत घडली. वाळू काढण्यासाठी लागणाऱ्या तराफ्यांवर कारवाई केली जाईल, या भीतीने राजू ते वाचवण्यासाठी नदीत उतरला होता. तराफे लपवण्यासाठी पोहत जात असताना राजूचा पाय अडकला आणि तो बुडाला. या घटनेनं सध्या हदगाव (Hadgaon, Nanded) तालुक्यात खळबळ माजली असून कयादू नदीतील अवैध वाळू उपशाचा प्रश्नदेखील पुन्हा ऐरणीवर आलाय. दरम्यान, हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी पोलीस आणि महसूल विभागाकडून सारवासारव सुरु असल्याचीही चर्चा आहे. बुडून मृत्यू झालेल्या राजू चव्हाण या तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठीही रुग्णालयातही पाठवण्यात आलाय.

अवैध वाळू उपशाचा प्रश्न..

पावसाने दोन दिवसांपासून नांदेडमध्ये काहीशी उसंत घेतलीय. दरम्यान, कयादू नदीत वाळू उपसा केला जातो आहे, याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळली होती. फोनवरुन तहसील कार्यालयात याबाबत माहिती देण्यात आली होती. पावसाने काहीसा ब्रेक घेतल्यानं अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना हालचालही सुरु केलेली. दरम्यान, पथक जर कारवाई करण्यासाठी आलं, तर वाळू उपसा करण्यासाठी लागणारे तराफे जाळून नष्ट केले जातील, अशी भीती राजू ज्ञानेश्वर चव्हाण या 17 वर्षीय तरुणाला होता.

हे सुद्धा वाचा

पोहताना पाय अडकला

तराफे वाचवण्यासाठी राजूने पाण्यात उतरून ते लपवून ठेवण्यासाठी दुसऱ्या बाजूला पोहत जाण्याचा प्रयत्न केला. पण पोहताना त्याचा पाय अडकून बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आणि तरुणाच्या बुडून मृत्यू झालेल्याचं प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी पोलीस आणि महसूल विभाग सारवा सारव करत असल्याची चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. दरम्यान आता राजू चव्हाण या तरुणाचा मृतदेह हदगाव उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पठवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षण विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत पाहणीही केली आहे. विशेष म्हणजे याच गावात वाळू उपसा वादावरुन एक खूनही झाला होता. तर आता एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्यानं अनेक शंका घेतल्या जात आहेत.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.