Nanded | रात्रीची गस्त बंद होताच, बाईक चोरांचा सुळसुळाट, चोरटे सीसीटीव्हीत कैद, पण पोलिसांना शोधण्यात अपयश
मुदखेडमध्ये होत असलेल्या बाईक चोरीमुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. या बाईक चोऱ्यांमुळे नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर या चोरट्यांना पकडण्याची मागणी जोर धरू लागलीयं. गेल्या काही दिवसांपासून चार ते पाच दिवसांनी बाईक चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
नांदेड : नांदेड (Nanded) जिल्हातील मुदखेडमध्ये चोरांनी धुमाकूळ घातलायं. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मुदखेड येथे चोऱ्या होण्याच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झालीयं. या चोरट्यांचे टार्गेट बाईक (Bike) असून सातत्याने मुदखेडमधून (Mudkhed) बाईक चोरी होत आहेत. बाईक चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद होऊनही पोलिसांना सापडत नसल्याने आर्श्चय व्यक्त केले जातंय. बाईक चोरी करत असताना हे चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात दिसते होते, त्यानंतर हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी बघितले, मात्र, असे असूनही अद्यापही या चोरांना पडकण्यात पोलिसांना यश आले नाहीयं.
सातत्याच्या बाईक चोरीमुळे नागरिक त्रस्त
मुदखेडमध्ये होत असलेल्या बाईक चोरीमुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. या बाईक चोऱ्यांमुळे नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर या चोरट्यांना पकडण्याची मागणी जोर धरू लागलीयं. गेल्या काही दिवसांपासून चार ते पाच दिवसांनी बाईक चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
बाईक चोरीवरून नागरिकांनी केला मोठा आरोप
बाईक चोरीच्या वाढलेल्या घटनांमध्ये नागरिकांनी पोलिसांनाच जबाबदार धरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त बंद केल्याने चोरीच्या घटना वाढल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी या प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी मुदखेडमधील नागरिकांनी केलीय. तसेच सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले चोर कधी पकडणार असा प्रश्न नागरिक पोलिसांना विचारताना दिसत आहेत.
मुदखेड पोलीसांचे मोठे अपयश
मुदखेडमध्ये बाईक चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना चोऱ्यांना पकडण्यामध्ये पोलिसांना अपयश आल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे हे बाईक चोर एका सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले असताना देखील पोलिसांनी अद्यापही या चोरांना पकडले नाहीयं. तसेच रात्रीची गस्त देखील पोलिसांनी बंद केली असल्यानेच चोरीचे प्रमाण वाढल्याचा नागरिकांनी थेट आरोप केलायं.