तलवारीनं हल्ला करत 10 लाखांच्या खंडणी मागितली! 7 दिवसांच्या आता दोघा खंडणीखोरांच्या मुसक्या आवळल्या
Nanded crime : आकाश लुळे आणि नाग्या गायकवाड या दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं अटक करण्यात आलेल्या दोघाही आरोपांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नांदेड : नांदेडमध्ये वाढत्या गुन्हेगारीला (Nanded Crime) आळा घालण्याचं मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर (Nanded Police) उभं ठाकलंय. अशातच तलावरीनं हल्ला करत खंडणीसाठी धमकावणाऱ्यांना नांदेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी नांदेड पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांनी एका व्यापाऱ्याच्या कारवर तलवारीनं हल्ला केला होता. त्यानंतर त्यांनी दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी नांदेडच्या विमानतळ पोलिसांत गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. अखेर पोलिस तपासाला यश आलं असून पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आता खंडणीखोरांचं धाबं दणाणलं आहे.
कोण आहेत खंडणीखोर आरोपी?
14 मार्च रोजी रामाश्रय सहा यांच्या कारवाई दोघांनी तलवारीनं हल्ला केला होता. यानंतर दोघांनी दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या धक्कादायक प्रकारानंतर रामाश्रय यांनी पोलिस धाव घेत तक्रार दिली होती.
विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत या घटनेची गंभीर दखल घेतली होती. तातडीनं तपास आणि चौकशी सुरु करत पोलिसांनी सात दिवसांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. खंडणीप्रकरणातील आरोपी आकाश लुळे आणि नाग्या गायकवाड अशा दोघांना बेड्या ठोकल्यात. या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिसांनी आता अधिक चौकशी करायला सुरुवात केली आहे.
अनेकांना लुटल्याचा संशय?
आकाश लुळे आणि नाग्या गायकवाड या दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं अटक करण्यात आलेल्या दोघाही आरोपांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांचीही आता कसून चौकशी केली जाते आहे.
अटक करण्यात आलेल्या आकाश लुळे आणि नाग्या गायकवाड यांनी याआधी असा हल्ला करत अनेकांना लुटलं असण्याचाही संशय व्यक्त केला जातो आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोघांच्या पोलीस चौकशीतून काय अधिक माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नांदेडमधील खंडणीखोरांना दणका बसला असून अनेकांचं धाबं दणाणलं आहे.
संबंधित बातम्या :
भंडाऱ्यात ओल्या पार्टीनंतर भांडण, मित्रांनीच तलवारीने केले सपासप वार, चार आरोपी गजाआड
Live In Video: लिव्ह इनचं झिंगाट, रस्त्यावर गोंगाट, पोट्टं टाईट, पोरीसोबत भररस्त्यात फाईट