VIDEO : दारात बसलेल्या भाजप युवा मोर्चाच्या माजी शहराध्यक्षावर गोळीबार
नांदेडमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha) माजी शहराध्यक्षावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत कसाबसा पळ काढल्याने त्याचा जीव बचावला.
नांदेड : नांदेडमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha) माजी शहराध्यक्षावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत कसाबसा पळ काढल्याने त्याचा जीव बचावला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोनू कल्याणकर (Sonu Kalyankar) असं या माजी शहराध्यक्षाचं नाव आहे.
या गोळीबाराच्या घटनेमुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोनू कल्याणकर श्रीनगर भागातील आपल्या घराच्या गेटमध्ये बसला होता. रात्री 9 च्या सुमारास दुचाकीवरुन तिघेजण त्याच्या घरासमोर आले. त्यापैकी दोघांनी सोनूवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या.
प्रसंगावधान राखत सोनू घरामध्ये पळाला त्यामुळे त्याचा जीव वाचला. अज्ञात हल्लेखोरांनी एकूण 3 गोळ्या झाडल्या. गोळीबाराची ही घटना पूर्व वैमानस्यातून घडली की इतर काही कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान गोळीबाराच्या घटनेने शहरात दहशत पसरली आहे.
VIDEO :
संबंधित बातम्या