नांदेड : नांदेड (Nanded Murder) शहरात झालेल्या स्वप्निल नागेश्वर हत्याप्रकरणी (Swapnil Nageshwor Murder News) महत्त्वाची घडामोड समोर आलीय. हत्येच्या 48 तासांच्या आतच पोलिसांनी (Nanded Police) हत्याकांडातील प्रमुख आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. नांदेड पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी एकूण 7 जणांना अटक केली आहे. स्वप्निल नागेश्वर या तरुणाच्या हत्येनंतर नांदेड शहरात एकच खळबळ उडाली होती.
नांदेडमध्ये एक तरुण महिलेसोबत फिरताना आढळून आला होता. ही महिला विवाहित असून तरुण वेगळ्या धर्माचा असल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आल्याचं बोललं जात होतं. अशातच आता या हत्याप्रकरणाच्या तपासात पोलिसांना मोठं यश आलंय.
स्वप्निल नागेश्वर या तरुणाला डंकीन परिसरात आणून त्याला 8 ते 10 जणांनी मिळून बेदम मारहाण केली होती. तसंच महिलेलाही मारहाण करण्यात आलेली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवत आरोपींना अटक केलीय. त्यानंतर नांदेड पोलिसांनी एकूण 7 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
या हत्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी शाहबाज एजाज खान देखील अटक केली आहे. शाहबाज आणि त्याच्या साथीदारांनी विवाहितेसोबत फिरणाऱ्या स्वप्निल नागेश्वर आणि त्याच्यासोबत महिलेला ऑटो रिक्षातून अपहरण करुन गोदावरी नदी घाट शेजारी परिसरात आणलं होतं. त्यानंतर तिथे थरारक घटना घडली होती. या हत्याकांडांचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं.
स्वप्निल नागेश्वर हा तरुण नांदेडच्या देगावचाळ परिसरात राहत होता. राहत्या घराशेजारील तरुणीसोबत स्वप्निल याचे प्रेमसंबंध होते. ही तरुणी दुसऱ्या धर्माची असल्यानं हे प्रकरण संवेदनशील आहे, हे लक्षात घेत पोलिसांनी तातडीने या हत्याकांड प्रकरणी गंभीर पावलं उचलली.
विमानतळ पोलीस ठाण्यात या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. आता आरोपींची कसून चौकशी केली जातेय. शायजाग खान याच्यासोबत एजाज खान, महम्मद सद्दाम महम्मद कुरेशी, महम्मद उसामा महम्मद साजिद कुरेशी, शेख आयान शैख इमाम, सोहेल खान साहेब खान, सय्यद फरहान, उबेद खान आणि युनूस खान अशा सात जणांना पोलिसांनी अटक केलीय.