तिची शेवटची ओळ… महिलांच्या हळवेपणाचा फायदा घेणाऱ्यांना फाशीच द्या!
शेवटच्या मजकुरात गीताने महिला आयोगाला विनंती केलीय. तिने लिहिलंय, ' माझी विनंती आहे की, जे असे समाजातील महिलांच्या हळवेपणाचा फायदा घेतात त्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी.
राजीव गिरी, नांदेडः त्याने दिलेला त्रास मी खूप सहन केला. आता मी मनातून खचलेय. ते आठवून खूप त्रास होतोय. आता सहन करू शकत नाही. मी आत्यहत्या (Suicide) करण्याचा निर्णय घेतलाय. पण महिलांच्या अशा हळवेपणाचा फायदा घेणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी महिला आयोगाला ( Commission for Women) विनंती आहे… या ओळी सुसाइड नोटमध्ये लिहित नांदेडच्या (Nanded Suicide) एका तरुणीने आत्महत्या केली आहे. गीता कल्याण कदम असं तिचं नाव आहे. 22 वर्षांच्या या तरुणीने वर्गातील मुलावर आरोप केले आहेत. त्याच्यामुळेच मी आत्महत्या करतेय, असंही तिने सुसाइड नोटमध्ये लिहून ठेवलंय…
बुधवारी 21 सप्टेंबर रोजी रात्री अभ्यासिका कक्षात गळफास घेऊन आत्महत्या केली. गीता ही 2020 पासून नांदेडला शिक्षणासाठी होती. तिच्या वर्गातील विद्यार्थी आदेश चौधरी त्रास देत असल्याचं तिने चिठ्ठीत लिहिलंय.
ती मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. यासंदर्भात तिचा भाऊ ज्ञानेश्वरने पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी ज्ञानेश्वर कदम यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फोटोवरून ब्लॅकमेल ?
गीताने सुसाइड नोटमध्ये लिहिलंय, ‘त्याने मला मी सेकंड इयरला असल्यापासून खूप त्रास दिला. माझं सगळ्यांशी बोलणं तोडलं. तो म्हणेल तेच मी करायचे, फोटोवरून तो मला ब्लॅकमेलही करायचा, घरी सांगतो म्हणायचा. मग तो म्हणेल ते मी करायचे. यामुळे मला मोठा धक्का पोहोचला….
मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी मला गोळ्या घ्याव्या वागल्याचंही गीताने चिठ्ठीत लिहिलंय. या काळात वैभव क्षीरसागर या माझ्या मित्राने मला यातून बाहेर येण्यासाठी खूप मदत केली. पण मी नाही येऊ शकले, असंही गीताना चिठ्ठीत लिहिलंय.
शेवटच्या मजकुरात गीताने महिला आयोगाला विनंती केलीय. तिने लिहिलंय, ‘ माझी विनंती आहे की, जे असे समाजातील महिलांच्या हळवेपणाचा फायदा घेतात त्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी. आदेश चौधरीला तर फाशीची शिक्षा द्या, प्लीज. त्याच्यामुळे आज मी मरून जात आहे. मी मरण्यामागे आदेश चौधरी याचा दोष आहे.’ गीताच्या सुसाइड नोटमध्ये वरील बाबींचा उल्लेख असल्याचे मोठा भाऊ ज्ञानेश्वर यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.