Nanded : पाणी भरणाऱ्या महिलेला वानराने विहिरीत ढकललं! गंभीर जखमी महिलेसोबत पुढे काय झालं?

आतापर्यंत अनेक महिलांना या वानरांनी जखमी केले आहे. तर नंदगाव येथील वानराने अनेकांना जोराचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. तर काल नंदगाव येथील पदवी पंडीत ताबारे ही महिला विहिरीवर पाणी भरत असतानाच वानराने या महिलेला विहिरीत ढकलून दिल्यानंतर एखच खळबळ उडाली होती.

Nanded : पाणी भरणाऱ्या महिलेला वानराने विहिरीत ढकललं! गंभीर जखमी महिलेसोबत पुढे काय झालं?
वानरांची दहशतImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 9:16 AM

नांदेड : बीडनंतर (Beed Money Trend) आता नांदेडमध्ये वानरांनी उच्छाद मांडला. धुमाकूळ घालणाऱ्या वानरांच्या मस्तीमुळे नांदेडमध्ये (Nanded News) एका महिलेवर बाका प्रसंग ओढावला होता. विहिरीत पाणी भरत असताना एका महिलेला वानराने विहिरीत ढकलून दिलं. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील (Kinwat, Nanded) नांदगावमध्ये ही घटना घडली. विहिरीत पडलेल्या या महिलेचा जीव अगदी थोडक्यात वाचलाय. विहिरीच्या शेदारीत असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखलं आणि विहिरीत पडलेल्या या महिेलला बाहेर काढलं. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. घाबरगुंडी उडालेल्या या महिलेला लोकांनी लगेचच दवाखान्यात नेलं. तिथे या महिलेवर उपचार करण्यात आले होते. या महिलेला किरकोळ दुखापत झाल्यानं वानराचा धक्का अगदी थोडक्यात निभावला, अशी भावना गावातील लोकांनी व्यक्त केलीय. दरम्यान, या घटनेला गावातील लोकांनी वनविभागाला जबाबदार धरलंय.

वनविभागावर आरोप..

वन विभागाने केलेलं दुर्लक्ष आणि हलगर्जीपणामुळे लोकांचा जीव धोक्यात येतो आहे, असा आरोप नांदेडच्या किनवट तालुक्यातील जनतेकडून केला जातोय. त्यामुळे वन विभाग आता अजून किती जणांचे जीव घेणार आहे, असा प्रश्न विचारला जातोय. इस्लापूर वन विभागाला अनेक वेळा माकडांचा आणि वानराचा बंदोबस्त करा, असे ग्रामपंचायतच्या वतीने सांगण्यात आलंय. मात्र वन विभाग याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असून इस्लापूर येथे माकडांचा प्रताप पाहायला मिळतोय.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंत अनेक महिलांना या वानरांनी जखमी केले आहे. तर नंदगाव येथील वानराने अनेकांना जोराचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. तर काल नंदगाव येथील पदवी पंडीत ताबारे ही महिला विहिरीवर पाणी भरत असतानाच वानराने या महिलेला विहिरीत ढकलून दिल्यानंतर एखच खळबळ उडाली होती. सुदैवाने शेजारील नागरिक धावले म्हणून ही महिला बालंबाल बचावलीय अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. यासाठी वन विभागाने तात्काळ या वानरांचा बंदोबस्त करावा अन्यथा इस्लापूर येथील वन विभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नातेवाईकांनी दिलाय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.