Murder | बापलेकाची हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी एकाचा मृतदेह पुरला, तर दुसऱ्या मृतदेहासोबत…

| Updated on: Mar 02, 2022 | 7:31 PM

Nanded Murder Case : अतिरीक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी तपासाची चक्र फिरवून पितापुत्रांच्या खुनाचा अखेर छडा लावलाय. या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे.

Murder | बापलेकाची हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी एकाचा मृतदेह पुरला, तर दुसऱ्या मृतदेहासोबत...
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) कचरा टाकण्याच्या वादातून दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाचा आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैशांच्या हव्यासातून थेट बापलेकाची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर एकाचा मृतदेह पुरण्यात आला होता. कुणाला हत्येचा संशय येऊ नये, यासाठी मारेकऱ्यांनी मृतदेह पुरल्याचं समोर आलं आहे. तर दुसरा मृतदेहा हा यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात नेऊन टाकण्यात आला होता. या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणातील आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं. अखेर आता याप्रकरणी पोलिसांनी आपलं कौशल्य पणाला लावत अखेर या हत्येचा छटा लावला आहे. या धक्कादायक हत्याकांडप्रकरणी (Murder case) पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे.

कुठं घडला प्रकार?

नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी इथं ही धक्कादायक घटना घडली होती. राजस्थानातून काही मजूर पिक काढणीची मशीन घेऊन कुंडलवाडीत आले होते. पैशांच्या कारणावरुन मजुरांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला ही यातूनच बापलेकाची हत्या करण्यात आली. 45 वर्षांच्या रशीद खान आणि 17 वर्षांचा अमजद खान यांना लोंखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण करुन त्यांचा जीव घेण्यात आला.

एक मृतदेह पुरला, दुसरा फेरला…

पैशांच्या हव्यासातून हे हत्याकांड करण्यात आलं होतं. याप्रकरणी पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं होतं. हत्या करण्यात आलेल्या रशीद खान यांच्या पत्नीनं याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपासाची सूत्र हलवली आणि अखेर तपासातून धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय.

अतिरीक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी तपासाची चक्र फिरवून पितापुत्रांच्या खुनाचा अखेर छडा लावलाय. या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे. रशीन खान यांचा मृतदेह कुंडलवाडी जवळ पुरण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी मारेकऱ्यांनी हे कृत्य केलं होतं. तर यवतमाळमधून अमजद खान याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

संबंधित बातम्या :

Nashik | पाटाच्या पाण्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला; मंत्री दानवेंचा नातेवाईक असल्याची चर्चा

ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीनचिट? NCBने दिलं स्पष्टीकरण

वर्धा नदीत आंघोळ करायला गेला मुलगा, बुडताना पाहून आई धावली! मुलासह आईचा बुडून मृत्यू

Nanded Murder | घरासमोर कचरा टाकण्यावरुन भावकीत वाद, दोघा सख्ख्या भावांची हत्या