Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded | अनैतिक संबंधाने घात झाला, महिलेची दगडाने ठेचून हत्या, दोघा नराधमांच्या मुसक्या आवळल्या!

सावरमाळ येथील महिलेच्या खून प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर फक्त तीन दिवसात पोलिस उपनिरिक्षक गजानन कांगणे यांनी तपासाची चक्रे फिरवत खून प्रकरणातील दोन आरोपीस गुरुवारी बेटमोगरा येथून ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे. मुखेड तालुक्यातील सावळी पाझर तलाव नजीक सावरमाळ शिवारातील पिंजारी यांच्या शेतातील पत्राच्या शेड समोर 35 वर्षांच्या महिलेचे डोके व चेहरा व पाठीवर जबर दगडाने ठेचून खून करण्यात आला होता.

Nanded | अनैतिक संबंधाने घात झाला, महिलेची दगडाने ठेचून हत्या, दोघा नराधमांच्या मुसक्या आवळल्या!
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 11:24 AM

नांदेड : अनैतिक संबंधातून मित्राच्या मदतीनेच महिलेची हत्या करणाऱ्या दोघांना पोलिसांनी (Police) अखेर अटक केलीय. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील सावरगाव माळ गावात चार दिवसांपूर्वी झालेल्या हत्येचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलय. काही दिवसांपूर्वी बेटमोगरा इथल्या प्रेमला भेंडेगांवकर या महिलेची (Women) दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मुखेड तालुक्यात शोधमोहीम राबवत दोन आरोपींना अटक (Arrested) केलीय. अनैतिक संबंध आणि आर्थिक देवाणघेवाणच्या वादातून ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

दगडाने ठेचून महिलेची हत्या

सावरमाळ येथील महिलेच्या खून प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर फक्त तीन दिवसात पोलिस उपनिरिक्षक गजानन कांगणे यांनी तपासाची चक्रे फिरवत खून प्रकरणातील दोन आरोपीस गुरुवारी बेटमोगरा येथून ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे. मुखेड तालुक्यातील सावळी पाझर तलाव नजीक सावरमाळ शिवारातील पिंजारी यांच्या शेतातील पत्राच्या शेड समोर 35 वर्षांच्या महिलेचे डोके व चेहरा व पाठीवर जबर दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. भर उन्हात चार दिवसाने प्रेत फुगून सडलेल्या अवस्थेत सापडले होते. त्यानंतर मुक्रमाबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

बेटमोगरा येथून आरोपींना अटक

पोलिस उपनिरिक्षक गजानन कांगणे हे या खून प्रकरणात तपास करत होते. तसेच पोलिस अधिकारी सचिन सांगळे, संग्राम जाधव, गोपीनाथ वाघमारे यांनी याप्रकरणी तपास करून खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून फक्त तीनच दिवसात आरोपी शंकर नामदेव खपाटे (36) श्रीराम उध्दव पिटलेवाड (31) यांना बेटमोगरा येथून ताब्यात घेऊन बेडया ठोकल्या. खाकीचा हिसका दाखविताच खुणातील आरोपीने पोलिसासमक्ष मयत महिलेशी माझे अनैतिक संबंध तर होतेच पण आर्थिक देवाघेवाणातून झाले वाद विकोपाला गेल्यामुळे माझ्या मित्राच्या मदतीने सावरमाळ शिवारात महिलेचा दगडाने ठेचून खुण केल्याची कबुली दिली आहे.

मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...