Nanded : संजय बियणींच्या हत्येनंतर नांदेड पोलीस एक्शन मोडमध्ये! 62 जणांकडून बंदुका, तलवारी आणि चाकू जप्त
Nanded Police : नांदेड पोलीस दलाकडून 5 एप्रिल ते 3 मे दरम्यान शहरात व जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून संशयित गुन्हेगार व्यक्तीकडून गावठी पिस्टल, बनावट पिस्टल, तलवार, खंजीर, गुप्ती असे वेगवेगळे हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
नांदेड : नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींची हत्या (Sanjay Biyani Murder case) करण्यात आली होती. त्यानंतर नांदेड हादरुन गेलं होतं. संजय बियाणींच्या हत्येनंतर पोलीस एक्शन मोडमध्ये आलेत. त्यांनी नांदेडमधील (Nanded crime News) वेगवेगळ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 60 हून अधिक गुन्हेगारांकडून बंदुका, तलवारी आणि चाकू जप्त करण्यात आलेत. बंदुका, तलवारी आणि चाकूंचा हा आकडा लक्षणी आहे. या कारवाईदरदम्यान, पोलिसांनी तब्बल देशी बनावटीचे 15 बंदूक,43 तलवारी, 28 चाकू हस्तगत केले आहे. आतापर्यंत नांदेड पोलिसांनी 62 आरोपींना अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी 50 गुन्हेदेखील दाखल करण्यात आलेत. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची कसून चौकसी नांदेड पोलीस (Nanded Police) करत आहेत. पाच एप्रिल रोजी नांदेडमध्ये संजय बियाणींची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दिवसाढवळ्या त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर संपूर्ण नांदेडमध्ये खळबळ उडालेली. त्यानंतर नांदेड पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
नांदेड पोलिसांची विशेष मोहीम
नांदेड शहरातील एमजीएम महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या दोन युवकांना विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विनापरवाना बेकायदेशीररीत्या तीन खंजर जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोन आरोपीविरुद्ध विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसऱ्या घटनेत पोलीस अंमलदार बंडू कलंदर हे गस्त घालत होते. त्यावेळी विनापरवाना बेकायदेशीररित्या खंजर बाळगणाऱ्या 35 वर्षीय दिलीप हरिसिंग पवार याला अटक केली. त्याच्याकडून खंजर जप्त करण्यात आले. विमानतळ पोलीस स्थानकात याप्रकरमी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठ्या प्रमाणात हत्यारं जप्त
नांदेड पोलीस दलाकडून 5 एप्रिल ते 3 मे दरम्यान शहरात व जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून संशयित गुन्हेगार व्यक्तीकडून गावठी पिस्टल, बनावट पिस्टल, तलवार, खंजीर, गुप्ती असे वेगवेगळे हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. अटक आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याखाली विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.