Nanded : ‘संजय बियाणींच्या पत्नीने जीवे मारण्याची धमकी दिली!’ दिराची तक्रार, बियाणींच्या कुटुंबात कलह

| Updated on: Jun 06, 2022 | 8:16 AM

Sanjay Biyani News : संजय बियाणींच्या हत्येनंतर नांदेडमधील बांधकाम विश्व हादरुन गेलं होतं.

Nanded : संजय बियाणींच्या पत्नीने जीवे मारण्याची धमकी दिली! दिराची तक्रार, बियाणींच्या कुटुंबात कलह
बियाणी कुटुंबात कलह
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नांदेड : 5 एप्रिलला नांदेडचे (Nanded News) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder Case) यांची हत्या करण्यात आली. दोन महिन्यांच्या तपासानंतर या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. आतापर्यंत एकूण 9 जणांना या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. हत्याप्रकरणाला उलगडा होतो न होतो, तोच आता बियाणी कुटुंबातील वाद (Sanjay Birayni Family Disput) चव्हाट्यावर आला आहे. बियाणी कुटुंबात कलह निर्माण झाला असून संजय बियाणी यांचा भाऊ आणि त्यांची पत्नी यांनी एकमेकांविरोधात पोलिसांना तक्रारी दिल्या आहेत. या तक्रारींमुळे नांदेडमध्ये चर्चांना उधाण आलंय. संजय बियाणींच्या भावानं संजय बियाणींच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. मला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारी संजय बियाणी यांच्या पत्नीविरोधात देण्यात आली आहे. कुटुंबातील कलह थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्यानं आता नवा वाद उफाळून आलाय.

नेमकं काय प्रकरण?

नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर आता बियाणी कुटुंब चर्चेत आलंय. दिवंगत संजय बियाणी यांच्या पत्नीने रविवारी रात्री आपल्या दिराच्या विरोधात चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. फायनान्स कंपनीचा डाटा संजय बियाणी यांचे भाऊ प्रवीण बियाणी यांनी चोरलाय, अशी तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली.

संजय बियाणी यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर त्याचे बंधू प्रवीण बियाणीदेखील पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनीदेखील आपल्या वहिनीविरोधात तक्रार केली. संजय बियाणींच्या पत्नीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार प्रवीण बियाणींनी केली आहे. परस्परविरोधी तक्रारींमुळे आता बियाणी कुटुंबातील कलह समोर आलाय. पतीचा भाऊ आणि वहिनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात गेल्यानं आता आश्चर्य व्यक्त होतंय.

हे सुद्धा वाचा

दिवसाढवळ्या झालेली हत्या..

संजय बियाणी यांची खंडणी वसुलीच्या कारणातून हत्या झाल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. संजय बियाणींच्या हत्येनंतर नांदेडमधील बांधकाम विश्व हादरुन गेलं होतं. संजय बियाणींची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आलेली. गाडीतून बाहेर पडल्यानंतर संजय बियाणीं यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. दुचाकीवरुन येत संजय बियाणी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला.

यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनं संपूर्ण नांदेडमध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान, संजय बियाणींच्या हत्येनंतर दोन महिन्यांनी कुटुंबातील कलह आता समोर आलाय. संजय बियाणी यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत.