दरवाजाची उंच कडी आतून कशी लावली? सांगा चौथीतल्या लेकीनं आत्महत्या केली की बरं वाईट झालं? नांदेडमध्ये खळबळ, वडिलांचा टाहो

नांदेडच्या सरकारी रुग्णालयात या मुलीच्या मृतदेहाचे इन कॅमेरा पोस्ट मार्टम करण्यात येत आहे.

दरवाजाची उंच कडी आतून कशी लावली? सांगा चौथीतल्या लेकीनं आत्महत्या केली की बरं वाईट झालं? नांदेडमध्ये खळबळ, वडिलांचा टाहो
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 3:47 PM

नांदेडः चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या माझ्या लेकीनं आत्महत्या (Suicide)केल्याचा दावा केला जातोय, तिने वसतिगृहाच्या खोलीचा दरवाजा आतून लावला, पलंगाला गळफास घेतल्याचं म्हटलं जातंय. पण इवल्याशा लेकीचा साडे ६ फूट दरवाजाच्या कडीला हातही पुरत नाही तर ती आतून कडी लावून आत्महत्या कशी करेल, असा प्रश्न मुलीच्या पित्याने केला आहे. चौथीत शिकणाऱ्या एका मुलीचा मृतदेह वसतिगृहातील (Hostel) पलंगाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्याचं सांगतायत. पण तिच्या मृतदेहावरून तर तसं दिसत नाहीये, असा आरोप गावकरी आणि नातेवाईकांनी केलाय. या घटनेने नांदेडमध्ये (Nanded) एकच खळबळ माजली आहे.

वसतिगृहाचे संचालक आणि पोलीस मिळून हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुलीचे नातेवाईक करत आहेत. माझ्या लेकीसोबत नेमकं काय झालं, हे लपवू नका, खरं काय ते सांगा, अशी कळकळीची विनंती तिचे नातेवाईक करत आहेत.

नांदेडमध्ये अवघ्या चौथीत शिकणाऱ्या मुलीने हॉस्टेलमध्ये गळफास लावत संशयास्पद आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. हदगांव तालुक्यातील केदारगुडा इथल्या शासकीय आश्रम शाळेच्या वसतिगृहात हा प्रकार घडला. विश्रांती देशमुखे असे मयत मुलीचे नाव असून तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सरपंच काय म्हणाले?

गावातील लोक गेले तेव्हा मुलीला जमिनीवर चादरीवर टाकलेलं होतं. त्या मुलीने पलंगावरून गळफास घेतल्याचं आम्हाला त्यावरून वाटत नाही.. तो दरवाजा साडेसहा फूटाचा आहे. साडेतीन फुटांची मुलगी दरवाजाची कडी आतून लानू शकत नाही. एक महिन्यापूर्वी एका मुलीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना याच वसतिगृहात घडली होती. याची चौकशी व्हायला पाहिजे, प्रशासनाने कडक कारवाई करायला पाहिजे, अशी मागणी गावातील सरपंचांनी केली आहे.

आपल्या दोन बहिणी बरोबर विश्रांती या वसतिगृहात राहत होती.. काल सांयकाळी शाळा लवकर सुटल्याने ती एकटी खोलीत आली आणि तिने पलंगाला फास लावत आत्महत्या केल्याचे सांगितलं जातंय.

मात्र खोलीतील पलंग आणि इतर बाबी पाहता घातपाताचा संशय व्यक्त होतोय. मनाठा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोस्टमार्टेम अहवालानंतर यामागे नेमकं काय कारण आहे, हे समजेल.

दरम्यान, मुलीने आत्महत्या केल्याचे वसतिगृह प्रशासनाने कुटुंबाला कळवले होते. त्या नंतर सोमवारी रात्री शाळेत नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. आश्रम शाळेच्या व्यवस्थापनाबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.

नांदेडच्या सरकारी रुग्णालयात मुलींचे इन कॅमेरा पोस्ट मार्टम करण्यात येत आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना मुलीच्या वडिलांनी आत्महत्येच्या घटनेवर संशय व्यक्त करत सखोल चौकशी करण्याची मागणी केलीय. तर अतिरिक्त महिला पोलीस अधीक्षक यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केलंय.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.