Nandurbar News : नवापूर शहरात चड्डी बनियन टोळीचा सुळसुळाट! चड्डी बनियन गँगचे म्होरके सीसीटीव्हीत कैद

चोरी करणारे चड्डी बनिया गँगमधील चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.

Nandurbar News : नवापूर शहरात चड्डी बनियन टोळीचा सुळसुळाट! चड्डी बनियन गँगचे म्होरके सीसीटीव्हीत कैद
चोरांचा सुळसुळाट...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 10:51 AM

नंदूरबार : नंदूरबार (Nandurbar Crime News) शहरातील नवापुरात (Navapur Police News) पेट्रोल चोरणारी चड्डी बनियन गँग सक्रिय झालीय. त्यामुळे लोक धास्तावलेत. रात्रीच्या वेळी घराबाहेर लावलेल्या दुचाकीतून ही टोळी चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. त्यामुळे आता या गँगच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान पोलिसांसमोर (Nandurbar Police News) उभं ठाकलंय. नवापुरातील शहरातील एका घराच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये या चोरट्यांचा वावर दिसून आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांकडून चोरट्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु असून अधिक तपास केला जातो आहे. शहारात दुचाकींमधील पेट्रोल चोरणारी टोळी म्हणून चड्डी बनियन गँग कुप्रसिद्ध आहे. त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी चोरीचे प्रयत्न केले आहेत. नवापुरात सध्या या चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. पोलिसही सध्या या चोरट्यांच्या मागावर आहेत.

चोरीचा प्रयत्न फसला

नवापूर शहरातील अल शिफा हॉस्पिटल नजीक असलेल्या सीस टिमोल यांचे वॉल कंपाऊंड आहे. या वॉल कंपाऊंडचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न या गँगच्या सदस्यांनी केला होता. पण त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या सतर्कतेने चोरटे घाबरले आणि त्यांनी पळ काढला. त्यानंतर हासिम पालावाला यांच्या घरच्या वरच्या मजल्यात चोरट्यांनी प्रवेश केला. त्याठिकाणी त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान, घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी पळ काढला.

पाहा व्हिडीओ : कामाची बातमी

हे सुद्धा वाचा

पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष

चोरी करणारे चड्डी बनिया गँगमधील चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. सदर चोरटे घरात शिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने नवापूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवापूर पोलीस या चोट्यांचा जेरबंद करून नवापूरकरांची भीती दूर करतील का असा प्रश्न उपस्थित केला. सध्या नवापूर पोलिसांसमोर या चोरड्यांना पकडण्याचं आव्हान आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.