Tractor Accident : गच्च भरलेल्या सुसाट ट्रॅक्टरचा हुक तुटला, अपघात पाहणाऱ्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकला
Tractor Accident : ट्रॅक्चरची ट्रॉली गच्च भरली, रस्त्यात ट्रॅक्टरचं तोंड उचलू लागलं, लोकं पाहत असताना चौकात हुक तुटला, नशिब बलवान म्हणून...
जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर (Tractor Accident) सध्या रस्त्याने जाताना आपण पाहत असतो. काही ट्रॅक्टर ट्रॉलीच्या (Tractor Trolly) क्षमतेपेक्षा अधिक भरले जातात. त्यामुळे अनेकदा अपघात झाल्याचे आपण पाहिले आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात सुध्दा असाच एक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे घडलेला सगळा प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे. 19 सेंकदाचा व्हिडीओ पाहत असताना अनेकांना घाम फुटला आहे. गच्च भरलेल्या सुसाट ट्रॅक्टरचा हुक तुटला, अपघात पाहणाऱ्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकला अशी स्थिती होती.
नेमकं काय झालं
ओव्हरलोड ऊस वाहतूक धोकादायक पद्धतीने होते, हे अनेकवेळा समोर आले आहे. याचा प्रत्यय तळोदा शहरातील वन विभागाच्या चेक पोस्ट समोर आला. 19 सेकंदाचा या व्हिडिओमध्ये तळोदा शहराच्या बायपास रस्त्यावरुन क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर जात होता. ट्रॉलीत वजन जास्त असल्याने ट्रॅक्टरची पुढची दोन चाके हवेत होती. ट्रॅक्टर खाली पडताच हुक तुटला, दैव बलवत्तर होते म्हणून चालक आणि बाजूला कुठलं ही वाहन नसल्याने मनुष्य हानी झाली नाही.
ओव्हरलोड ट्रॅक्टर चालवणाऱ्या चालकांवरती कारवाई का करण्यात येत नाही. त्याचबरोबर लोकांच्या जीवाशी नेमकं खेळतंय कोण असा प्रश्न अनेक लोकं विचारु लागले आहेत.