ट्रकच्या टक्करने पिकअप व्हॅनचा चुराडा; नाशिकचे 3 तरुण गतप्राण, दोघे गंभीर 

नाशिक जिल्ह्यातल्या चाचडगावजवळ आयशर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये झालेली धडक इतकी भयंकर होती की, यात पिकअप व्हॅनचा जागेवरच चुराडा झाला. या घटनेमुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची माहिती समजताच चाचडगावच्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ट्रकच्या टक्करने पिकअप व्हॅनचा चुराडा; नाशिकचे 3 तरुण गतप्राण, दोघे गंभीर 
नाशिकमध्ये चाचडगावजवळ ट्रकच्या धडकेत पिकअप व्हॅनचा चुराडा झाला.
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 10:44 AM

नाशिकः नाशिक-पेठ महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये (Accident) तीन तरुण (Youth) जागीच ठार झालेत. आयशर आणि पिकअप व्हॅनमध्ये हा अपघात झाला. यामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. कमलेश मोरे, संतोष लांडे, हेमंत मोरे अशी मृतांची नावे आहेत. हे तिन्ही तरुण चाचडगावचे आहेत. त्यामुळे गावावर शोककळा पसरलीय. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, पेठ येथून एक आयशर (एमएच 15, पीव्ही 8934) नाशिककडे (Nashik) जात होता. तर चाचडगावहून एक पिकअप व्हॅन (एमएच 15, एजी 937) पेठकडे जात होती. यावेळी दोन्ही वाहनांची भीषण टक्कर झाली. या अपघातात पिकअपमधील संतोष हिरामण लांडे (वय 25), कमलेश सुखदेव मोरे (वय 27) आणि हेमंत रघुनाथ मोरे (वय 26) या चाचडगाव येथील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातामध्ये लखन भगवान गांगोडे आणि रवींद्र वामन पोटींदे हे दोघे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रस्त्यावर रक्ताचा सडा

आयशर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये झालेली धडक इतकी भयंकर होती की, यात पिकअप व्हॅनचा जागेवरच चुराडा झाला. या घटनेमुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची माहिती समजताच चाचडगावच्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती समजली. ते ही तातडीने पोहचले. त्यांनी रस्त्यावरील मृतदेह, अपघातग्रस्त वाहने हटवली. या घटनेने चाचडगावसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दुचाकीस्वारांचे अपघात सत्र

नाशिकमध्ये दुचाकीस्वारांचेही अपघात सत्र थांबताना दिसत नाही. हे मृत्यू थांबवण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन त्यांना केंद्रावर नेत त्यांचे समुपदेशन करण्याची मोहीम सुरू केली. कठोर हेल्मेटसक्ती केली. मात्र, त्यानंतरही कोणी हेल्मेट घालत नाही. अपघात सुरूच आहे. त्यात अनेकांचे मृत्यू होत आहेत.

वेगावर नियंत्रण ठेवा

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अपघात वाढले आहेत. हे पाहता वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे. वेगाची नशा जीवनावर भारी पडते. हे ध्यानात घेऊनच वाहने चालवावीत, असे आवाहन वाहतूक पोलीस आणि पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. मात्र, वाहनधारक इकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे अपघातातील मृतांचे प्रमाण वाढले आहे.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.