नाशिकः प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. प्रेमाची महती मीर, गालिबपासून ते नाशिकच्या (Nashik) कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेतून वारंवार मांडली. प्रेम असतेच तसे. ते जे करतात, त्यांनाच त्याची कल्पना. मात्र, काही-काही प्रियकर इतके विकृत असतात की, त्यांना मागचे-पुढचे काही दिसत नाही. प्रेम म्हणजे दुसऱ्यावर सर्वस्व अर्पण करणे. इथे मात्र, प्रेयसीच्या अंगावर डिझेल ओतून, तिचा भिजलेला ड्रेस गॅसवर धरून तिला जिवंत जाळले जाते. अशाच क्रूरकर्मा प्रियकराला न्यायालयाने (Court) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या भयंकर हत्याकांडाची बित्तमबातमी माणुसकीला काळीमा फासेल अशीच आहे. सध्या दोन दिवसांत व्हॅलेंटाईन वीक सुरू होईल. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने ही बातमी वाचावी. आपले प्रेम कसे आहे आणि ते असे होऊ नये, इतकी काळजी जरूर घ्यावी.
नेमके प्रकरण काय?
सरला उर्फ सारिका बाबासाहेब गायकवाड आणि प्रवीण डोईफोडे. दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम. त्यामुळेच सारिकाने आपले घरदार सोडले. नवरा सोडला. दोन लहान मुले सोडली. तिने प्रियकर प्रवीण सोबत राहायला सुरुवात केली. दोघेही आडगाव वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एकत्र रहायचे. मात्र, 8 सप्टेंबर 2019 रोजी त्यांच्या भांडण झाले. कारण किरकोळ होते. मात्र, प्रवीण संतापला. म्हणतात ना, राग आणि भीक माग. अगदी तसेच झाले. त्याने रागाच्या भरात सरलाच्या अंगावर डिझेल ओतले. तो इतक्यावर थांबला नाही. त्याने तिचा डिझेलने निथळत असलेला ड्रेस चक्क गॅस सुरू करून त्यावर धरला. क्षणात आगीने पेट घेतला. सरला त्याच्यासमोर किंकाळ्या फोडत होती. जिवंत जळत होती. मात्र, नराधम प्रियकराच्या काळजाला पीळ पडला नाही. या घटनेत गंभीर भाजलेल्या सरलाने प्राण सोडला.
साक्षीदार, सबळ पुरावे
पोलिसांनी याप्रकरणी तपास केला. आरोपी प्रवीण डोईफोडेला बेड्या ठोकल्या. त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश रूपेश राठी यांच्यासमोर झाली. त्यांनी सारे साक्षीदार आणि पुरावे तपासून प्रियकर प्रवीण डोईफोडे यास जन्मठेप व दहा रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हे प्रकरण ऐन व्हॅलेंटाईन डेच्या काही दिवस अगोदर न्यायालयासमोर सुनावणीस आले. हे पाहता आपले वय कसेही असो, प्रेम कुणावरही होवो, मात्र त्याचे द्वेषाच्या इतक्या टोकात रूपांतर होऊ नये याची काळजी साऱ्यांनीच घ्यावी.
न्यायाधीशांची संवेदनशीलता
मृत सरलाला दोन लहान मुले आहेत. याची माहिती खटल्याच्या सुनावणीत समोर आली. तेव्हा न्यायाधीश रूपेश राठी यांनी या मुलांचा तातडीने शोध घ्या. त्यांचे पुनर्वसन करा. पीडित बाधितांच्या भरपाईसाठी सरकार निधी देते. त्यातून मुलांचे शिक्षण आणि पुढील सोय करा, असे आदेस त्यांनी यावेळी पोलिसांना दिले.
Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?
Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?