Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅस गिझर गळतीमुळे बाथरूमध्येच पडल्या बेशुद्ध; पायलट महिलेचा हकनाक मृत्यू, नाशिकमधील धक्कादायक घटना

गॅस गिझर गळतीमुळे याआधी देखील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे गिझर हाताळताना अतिशय काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन पोलीस आणि तज्ज्ञांनी केले आहे.

गॅस गिझर गळतीमुळे बाथरूमध्येच पडल्या बेशुद्ध; पायलट महिलेचा हकनाक मृत्यू, नाशिकमधील धक्कादायक घटना
रश्मी गायधनी
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 3:33 PM

नाशिक : गॅस गिझरच्या गळतीमुळे (Gas Geyser leakage) पायलट महिलेला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये (Nashik) समोर आली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रश्मी गायधनी (Rashmi Gaidhani) या मुंबईत एअर इंडियामध्ये सिनिअर पायलट म्हणजेच ज्येष्ठ वैमानिक होत्या. आंघोळीच्या वेळी गॅस गिझरमधून गळती झाल्यामुळे बाथरुममध्येच गुदमरुन गायधनी यांचा करुण अंत झाला. मुंबईवरून त्या नाशिक मध्ये राहणाऱ्या आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी आल्याअसताना ही दुर्दैवी घटना घडली. ज्येष्ठ लेखिका सुमन मुठे आणि सेवानिवृत्त वनाधिकारी मारोती मुठे हे रश्मी गायधनी यांचे आई-वडील आहेत.

कशी घडली घटना?

रश्मी गायधनी या नाशिकला आल्यानंतर शनिवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेल्या असता अचानक त्यावेळी गॅस गिझरमध्ये गळती झाली. या गळतीमुळे त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या. यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. या संपूर्ण घटनेसंदर्भात रश्मी यांच्या घरच्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

पोलिसांची चौकशी सुरू

दरम्यान, या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत अधिक चौकशी केली आहे. या दुर्दैवी घटनेत एका महिला वैमानिकाला आपले प्राण गमवावे लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. गॅस गिझर गळतीमुळे याआधी देखील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे गिझर हाताळताना अतिशय काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन पोलीस आणि तज्ज्ञांनी केले आहे. दरम्यान, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत

गॅस गिझर गळतीच्या घटना

कर्नाटकातील बंगळुरुमध्ये यापूर्वी एक 35 वर्षीय महिला आणि तिच्या 7 वर्षांच्या मुलीचा गॅस गिझरमधून झालेल्या विषारी वायू गळतीमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. गॅस गिझर गेल्या काही काळापासून अनेक जणांकडे वापरात आहेत. सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या नियमित गिझरला ते पर्याय ठरतात. मात्र, योग्य सुरक्षा राखली गेली नाही तर ते वापरणे थोडे धोकादायक आणि प्राणघातक देखील ठरु शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

इतर बातम्याः

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.