मित्राला आधी यथेच्छ दारू पाजली, नंतर छातीत सुरा खुपसला; नाशिकमधील क्रूरकर्म्याला 5 वर्षांची सक्तमजुरी
मित्राचा खून केल्याचे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात आले. यावेळी न्यायाधीशांनी 10 जणांची साक्ष तपासली. शिवाय पोलिसांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरले. मात्र, दीपकचा सुनीलला ठार मारण्याचा हेतू नसल्याचे वकिलांनी सांगितले. हे मत न्यायालयाने मान्य करत त्याची खुनाच्या गुन्हातून सुटका केली. मात्र, सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले.
नाशिकः बाई, बाटली, पैसा यांची नशा डोक्यात गेली की माणसातला हैवान जागा होतो. तो मग मागचा-पुढचा विचार करत नाही. सारासार विवेक गुंडाळून ठेवतो. सख्खा भाऊ पक्का वैरी होतो. अन् जीवलग दोस्तच मारेकरी. नेमकी अशीच घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या जळगाव खुर्द शिवारात घडली. सुनील धर्मा केदार याचा खून (Murder) केल्याप्रकरणी आरोपी दीपक कौतिक केदार (वय 30) रा. कळमडू ता. चाळीसगाव यास जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी 5 वर्षे कारावास (Imprisonment) आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड नाही भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यावेळी न्यायाधीशांनी 10 जणांची साक्ष तपासली. शिवाय पोलिसांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरले.
नेमके प्रकरण काय?
चाळीसगाव तालुकत्याते कळमडू येथील दीपक केदार आणि सुनील धर्मा केदार दोघेही जीवलग दोस्त. मात्र, दीपक केदार याचे मृत सुनील केदार यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. या संबंधात दीपकला सुनील यांचा अडथळा वाटायचा. त्यामुळे त्याने त्यांना संपवण्याचा कट रचला. त्यासाठी सुनीलला कळमडू येथून जळगाव खुर्दी येथे आणले. तिथे यथेच्छ दारू पाजली. दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाले. शेवटी दीपकने सुनीलच्या छातीत सुरा खुपसून त्याचा खून केला. याप्रकरणी सुनीलचा भाऊ अनिल केदार यांनी दीपकविरोधात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास करून दीपकला बेड्या ठोकल्या होत्या.
10 जणांची साक्ष
मित्राचा खून केल्याचे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात आले. यावेळी न्यायाधीशांनी 10 जणांची साक्ष तपासली. शिवाय पोलिसांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरले. मात्र, दीपकचा सुनीलला ठार मारण्याचा हेतू नसल्याचे वकिलांनी सांगितले. हे मत न्यायालयाने मान्य करत त्याची खुनाच्या गुन्हातून सुटका केली. मात्र, सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले. त्यानुसार 5 वर्षे कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड नाही भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
सुनील केदार खून प्रकरण
– भावाने दाखल केला गुन्हा
– परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे
– खुनाच्या आरोपातून मुक्तता
– सदोष मनुष्यवधात दोषी
– पाच वर्षे कारावासाची शिक्षा
– 25 हजार रुपये दंड
– दंड न भरल्यास शिक्षा
– 6 महिने सश्रम कारावास
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!