Nashik Crime : पत्नी नांदायला येत नाही, पतीकडून सासूची हत्या! पत्नी आणि मुलीवरही विळ्याने वार; त्र्यंबकेश्वरमधील धक्कादायक प्रकार

सासूसोबतचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पत्नी आणि मुलीवर धारदार विळ्याने वार केले. या घटनेत सासूचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलगी गंभीर झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Nashik Crime : पत्नी नांदायला येत नाही, पतीकडून सासूची हत्या! पत्नी आणि मुलीवरही विळ्याने वार; त्र्यंबकेश्वरमधील धक्कादायक प्रकार
घाटी पोलीस ठाणेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 10:19 PM

नाशिक : माणूस किती क्रूर बनू शकतो याचा प्रत्यय नाशिकमध्ये (Nashik) आलाय. पत्नी नांदायला येत नाही या कारणाची कुरापत काढत जावयाने सासुच्या पोटात कात्री खुपसून तिची हत्या केली. तर भांडण सोडवणाऱ्या पत्नी आणि मुलीवरही विळ्याने वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बु. येथे घडली आहे. झारवड येथील जोशी कंपनी जवळ राहणाऱ्या सासूवर जावयाने धारदार कात्रीने हल्ला केला. सासूसोबतचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पत्नी आणि मुलीवर (Wife and Daughter) धारदार विळ्याने वार केले. या घटनेत सासूचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलगी गंभीर झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (Nashik District Hospital) दाखल करण्यात आलंय. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं.

सासूची हत्या, पत्नी आणि लेकीवरही वार

या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात बाळा निवृत्ती भुतांबरे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जांभुळवाडी येथील कळमुस्ते गावातील किसन महादु पारधी याचे लग्न झारवड येथील कमळाबाई सोमा भुंताबरे यांच्या मुलीशी झाले होते. आरोपी किसन महादु पारधी याला दारुचे व्यसन असल्याने त्याची पत्नी इंदुबाई सासरी नांदायला जात नव्हती. रविवारी सकाळी दहा वाजता किसन पारधी याने पत्नी इंदुबाई नांदायला का येत नाही? अशी कुरापत काढत तिच्यावर विळ्याने हल्ला केला. त्यावेळी सासू कमळाबाई सोमा भुताबरे (वय 55 वर्ष) आणि मुलगी माधुरी (वय 12 वर्ष) या भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता आरोपीने मुलीच्या हातावरही विळ्याने वार करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसंच सासू कमळाबाई भुतांबरे यांच्या पोटात आणि पाठीत कात्री वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपीने पत्नीच्या गळ्यावर विळ्याने गंभीर वार केल्याने तिची प्रकृति चिंताजनक असल्याची माहिती फिर्यादीकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात किसन पारधी विरोधात भादवि कलम 302, 307, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला अटक, तपास सुरु

दरम्यान, घटना घडलेल्या ठीकाणी पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, सहायक पोलीस दिलीप खेडकर आदींनी भेट दिली आणि तपास केला. यावेळी पोलीसांनी आरोपी किसन पारधी याला अटक केली आहे. आरोपी किसन पारधीही जखमी असल्याने त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, महिला सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास, पोलीस हवालदार शितल गायकवाड, रविराज जगताप, शिवाजी शिंदे, गोविंद सदगीर, अमोल केदारे, कोरडे, पंकज दराडे आदी करीत आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.