Crime News : चिकू तोडताना महिलेने हटकले, मग घरात शिरुन गावगुंडाने….,
दोघांच्या झालेल्या झटापटीत महिला किरकोळ जखमी झाली आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी या गावगुंडाची धास्ती घेतली आहे. पोलिसांनी सिडको भागात अशा गावगुंडांचा वेळीच बंदोबस्त लावावा अशी मागणी देखील येथील स्थानिक नागरिक करत आहे.
नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरातील (Nashik) हनुमान चौक शॉपिंग सेंटर (Hanuman chouk shoping centre) येथील एका घराच्या अंगणाबाहेरील चिकूच्या झाडावरील चिकू तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावागुंडास महिलेने हटकल्याने त्याने थेट घराचा सुरक्षा दरवाजा ओलांडून घरात शिरून महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही (cctv) मध्ये कैद झाली आहे. अंगणातील झाडावरून चिकू तोडल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेवर एका संशयिताने हल्ला केला. या महिलेने न घाबरता मोठ्या हिमतीने त्याचा विरोध केला. यावेळी आरडा ओरड झाल्याने शेजारील नागरिक जमा होऊ लागल्याने संशयित गावगुंडाने सदर महिलेस धमकावत तेथून पळ काढला.
स्थानिकांची मागणी…
दोघांच्या झालेल्या झटापटीत महिला किरकोळ जखमी झाली आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी या गावगुंडाची धास्ती घेतली आहे. पोलिसांनी सिडको भागात अशा गावगुंडांचा वेळीच बंदोबस्त लावावा अशी मागणी देखील येथील स्थानिक नागरिक करत आहे. नाशिक जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीच्या गुन्हांमध्ये अधिक वाढ झाली आहे.
नाशिक आणि पंचवटी परिसरातील धोकादायक वाडे…
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने नोटीसा देऊनही नाशिक शहरातील जुने नाशिक आणि पंचवटी परिसरातील धोकादायक वाडे, इमारती हटवले जात नसल्यामुळे आता थेट मनपा आयुक्तांनी इशारा दिला आहे. अशा धोकादायक इमारती कोसळल्यास मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. एवढेच नव्हे तर अशा धोकादायक इमारती आणि मिळकती रिकाम्या करण्याची जबाबदारी मनपाच्या विभागीय अधिकाऱ्यांवर असल्याने त्यांच्यावर देखील कारवाईची टांगती तलवार असणार आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या अशोक स्तंभ येथे असाच धोकादायक वाडा कोसळून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. त्यामुळे आता महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.