Malegaon : भरधाव वेगाने निघालेला कंटेनर कांदा चाळीत घुसला, आवाजामुळे लोक इकडे तिकडे पळू लागली
देवळा सटाणा महामार्गावर लोहनेर जवळ रस्त्याला लागूनच असलेल्या एका कांदा चाळीत थेट कंटेनरच घुसला त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
मनोहर शेवाळे, मालेगाव : भरधाव वेगाने निघालेला कंटेनर (container truck) कांदा चाळीत (kanda chowl) घुसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मालेगाव (malegaon) देवळा सटाणा महामार्गावर लोहनेर जवळ घडली आहे. रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या पारंब्यामुळं रस्त्या नीट दिसत नाही. त्यामुळे अपघात झाला : भरधाव वेगाने निघालेला कंटेनर कांदा चाळीत घुसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मालेगाव देवळा सटाणा महामार्गावर लोहनेर जवळ घडली आहे. रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या पारंब्यामुळं रस्त्या नीट दिसत नाही. त्यामुळे अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशन तक्रार दाखल झाली आहे.
नेमकं काय झालं
देवळा सटाणा महामार्गावर लोहनेर जवळ रस्त्याला लागूनच असलेल्या एका कांदा चाळीत थेट कंटेनरच घुसला त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कांदा चाळ जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महामार्गावर असलेल्या मोठ्या झाडांच्या पारंब्या वाढल्याने वळण रस्ता लक्षात न आल्याने हा प्रकार घडला असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे यामध्ये कसल्याही प्रकारची जीवितहाणी झालेली नाही.