बरं नसल्याने लग्नाला गेले नाही…नंतर जे काही घडलं त्यात आजोबांचा मृत्यूच झाला…

नाशिक शहरातील अंबड वसाहतीत एक्स्लो पॉईंट परिसरात राहणाऱ्या बच्चू कर्डेल यांचा खून झाला असून त्यांच्या घरातील लाखों रुपयांचे दागिने चोरीला गेले आहे.

बरं नसल्याने लग्नाला गेले नाही...नंतर जे काही घडलं त्यात आजोबांचा मृत्यूच झाला...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 11:02 AM

नाशिक : नाशिकच्या ग्रामीण भागातील दरोडयाचे लोण आता नाशिक शहरात येऊन ठेपले आहे. शुक्रवारी रात्री नाशिकच्या अंबड परिसरात एका वृद्धाचा खून करून दागिने आणि रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बच्चू सदाशिव कर्डेल या 65 वर्षीय वृद्धाचा खून झाला आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. अंबडच्या कर्डेल मळ्यात हा सर्व प्रकार घडला आहे. कर्डेल यांच्या खुनाची घटना पोलिसांना समजताच नाशिक शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. कर्डेल यांच्या चुलत पुतण्याची हळद समारंभ होता, त्याकरिता संपूर्ण कुटुंब हळदीला गेले होते. लग्नाची सर्वधामधूम असल्याने संपूर्ण कुटुंब बाहेर गेले होते. मात्र, बच्चू कर्डेल यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी घरीच थांबतो, मळ्यात कोणीतरी थांबायला पाहिजे म्हणून बच्चू सदाशिव कर्डेल थांबले होते. अचानक दहा वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरात घुसून डोक्यात तीक्ष्ण हत्याराणे वार केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक शहरातील अंबड वसाहतीत एक्स्लो पॉईंट परिसरात राहणाऱ्या बच्चू कर्डेल यांचा खून झाला असून त्यांच्या घरातील लाखों रुपयांचे दागिने चोरीला गेले आहे.

बच्चू कर्डेल यांच्या चुलत भावाच्या मुलाची हळद समारंभ असल्याने घरातील सर्व कुटुंब बाहेर गेले होते. हीच संधी साधून दरोडेखोरांनी बच्चू कर्डेल यांच्या डोक्यात हत्याराणे वार करून जीवे ठार मारले आहे.

हे सुद्धा वाचा

यावेळी घरातील कोठीत दागिने आणि लाखों रुपयांची रोकड ठेवण्यात आली होती, ती देखील दरोडेखोरांनी लंपास केली आहे.

यामध्ये चोरांना जर चोरी करायची होती तर बच्चू कर्डेल यांना जीवे ठार का मारले ? असा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहे.

ग्रामीण भागात महिनाभरातच पाच दरोडे पडल्याची घटना समोर आली आहे त्यात आता दरोडे शहरातही पडू लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून कारवाईची मागणी केली जात आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.