Nashik Crime | तलवारी घेत नंगानाच करणाऱ्या भाईंची इलाक्यातच जिरवली मस्ती, पोलिसी खाक्या कसा असतो, जाणून घ्याच!
देशभरात नाशिकचे उद्योनगरी आणि पर्यटननगरी म्हणून नाव विख्यात आहे. आता याच नगरीची क्राईमनगरीकडे होणारी वाटचाल अतिशयक धक्कादायक आणि धोकादायक अशीच आहे.
नाशिकः देशभरात नाशिकचे (Nashik) उद्योनगरी आणि पर्यटननगरी म्हणून नाव विख्यात आहे. आता याच नगरीची क्राईम (Crime) नगरीकडे होणारी वाटचाल अतिशयक ही धक्कादायक आणि धोकादायक अशीच आहे. काही दिवसांपूर्वी एकामागे एक झालेले तीन खून. त्यात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची झालेली हत्या. या साऱ्या घटनांनी राज्य ढवळून निघाले. हे प्रकरण थेट विधिमंडळात पोहचले. आता त्याच नाशिकमध्ये चक्क हातात कोयते आणि तलवारी घेऊन काही भाई लोकांनी चक्क रस्त्यावर नंगानाच केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हे सारे खून, हाणामाऱ्या प्रकरणातील आरोपी आहेत. याचा सुगावा पोलिसांनी लागताच त्यांनी या भाई लोकांची मस्ती चक्क धिंड काढून जिरवली. त्यानंतर कोणी पुन्हा असा प्रकार करायला धजावणार नाही, असा पोलिसी इंगा त्यांना दाखवला. तुम्हीही हा पोलिसी खाक्या जरूर जाणून घ्या…
नेमके प्रकरण काय?
नाशिकमधल्या सातपूर भागातली ही घटना. या परिसरात अनेकजण भाईगिरी करायला पुढे असतात. हाताता काम नसते. त्यात भाईगिरी करायला कसलीही गुंतवणूक म्हणा अथवा श्रम करावे लागत नाहीत. एखादे टोळके सोबत असले की, लोकही आपोआप नरमतात. मात्र, या लोकांची भाईगिरी जास्त झाली. त्यातले अनेकजण खून, हाणामारी प्रकरणातले आरोपी. त्यांनी हातात कोयते, तलवारी घेऊन चक्क रस्त्यावर नंगानाच केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना वठणीवर आणण्यासाठी अखेर पोलिसी खाक्याचा हिसका दाखवला.
पोलिसांनी काय केले?
सातपूर परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे सरसावले आहेत. मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच येथील पदभार घेतलाय. त्यांच्या कानावर ही बातमी पडली. त्यांनी संशयितांचा शोध सुरू केला. तेव्हा सातपूर परिसरातील सराईत गुन्हेगार अक्षय पाटील, शुभम राजगुरू आणि इतरांचा त्यात समावेश असल्याचे समोर आले. पोलिसांनी या भाईंची मस्ती उतवरवण्यासाठी चक्क भाईच्या इलाक्यातून धिंड काढली. सोबत पार्श्वभागावर पोलिसांचे बसणारे फटके होतेच. ही धिंड पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली. येथून पुढेही गुन्हेगारांची खैर नाही, असा इशारा पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी दिला आहे. पोलिसांनी असेच काम केले, तर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल, यात शंकाच नाही.
इतर बातम्याः
Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास
Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली