तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही, अशा ठिकाणी सुरू होतं हुक्का पार्लर, पोलिसांच्या कारवाईनंतर उडाली खळबळ
हॉटेलचे मालक संशयित शंकर राजाराम पांगरे, व्यवस्थापक संशयित नितीन अहिरे यांच्यासह ग्राहक असलेल्यांना बेड्या ठोकत गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : नाशिकच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ( Anti Narcotics Squad ) केलेली कारवाई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अवैध धंदे बंद करण्या करिता नाशिक शहर पोलीसांनी ( Nashik Police ) कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे ( CP Ankush Shinde ) यांच्या आदेशाने हे पथक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार गोपनीय माहितीच्या आधारे शहर पोलीसांनी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नुकतीच इंदिरानगर भागात एक कारवाई केली आहे. यामध्ये अवैधरित्या पेरूच्या बागेत सर्रासपणे हुक्का पार्लर सुरू होते. पोलीसांनी छापा टाकून यामध्ये हॉटेल चालकासह ग्राहकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हुक्का पार्लरवर छापा टाकल्यानंतर हुक्क्याचे वेगवेगळे फ्लेवर, अमली पदार्थ आणि इतर साहित्य हस्तगत केले आहे. याच हुक्का पार्लर येथे तरुण तरुणींची मोठी रेलचेल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
हॉटेल द पेरू फार्म नावाने सुरू असलेल्या परिसरात महाविद्यालय तरुण तरुणींची मोठी गर्दी असायची. हुक्का पार्लर असल्याने पेरूच्या बागेत त्याचं नियोजन करण्यात आले होते.
पोलीस पथकाला पेरूच्या बागेत हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांच्या पथकाने छापा टाकला होता, त्यामध्ये नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
हॉटेलचे मालक संशयित शंकर राजाराम पांगरे, व्यवस्थापक संशयित नितीन अहिरे यांच्यासह ग्राहक असलेल्यांना बेड्या ठोकत गुन्हा दाखल केला आहे.
कुठलीही परवानगी न घेता हुक्का बार चालविणे, तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यासाठी जागा आणि वस्तु पुरविणे या अनुषंगाने पोलीसांनी कारवाई केली आहे.
मागील आठवड्यातही नाशिकच्या मध्यवर्ती भागात सर्रासपने गांजा विक्री केला जात होता. त्यामध्ये गांजा विक्री करत असतांना अमली पदार्थ विरोधी पथकाने रंगेहाथ पकडले होते.
नाशिक शहरातील विविध भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर पोलीसांनी कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. पोलीसांनी केलेल्या या कारवाईचे नाशिकमधून कौतुक केले जात आहे.