जबरदस्तीने रौलेट जुगार खेळायला लावला, 75 लाखांचे कर्जही दिले; नाशिकमध्ये तिघांना बेड्या, प्रकरण काय?
रौलेट बिंगो हा ऑनलाईन जुगार आहे. या जुगारात अनेकजण पैसे गुंतवतात. निराश होतात. आणि पुन्हा टोकाचे पाऊल उचलतात. अंजनेरी येथे यापूर्वी या जुगारातून कर्जबाजारी झाल्यामुळे एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केली आहे
नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) रौलेट (Roulette) जुगाराने तरुणांच्या गळ्याभोवती आवळलेला फास काही केला सैल व्हायला तयार नाही. एका तरुणाला जबरदस्तीने रौलेट जुगार खेळायला लावला. त्याला तब्बल 75 लाख रुपयांचे कर्ज दिले. त्यानंतरही पुन्हा जुगार खेळत नाहीस म्हणून कर्ज वसुलीचा तगादा लावल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल असून, पोलिसानी तिघांना बेड्या ठोकल्यात. विशेष म्हणजे रौलेट जुगारात कर्जबाजीरपण आल्यामुळे अनेकांनी आपली पत्नी आणि लहान-लहान मुले मागे सोडून या जगाचा निरोप घेतलाय. तसाच प्रकार या आठवड्यात आणखी एकदा घडला होता. गोरख त्र्यंबक गवळी शेतकरी (farmer) पुत्राने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यातून गोरख वाचला. याप्रकरणी गोरखला 75 लाखांचे कर्ज पुरवणाऱ्या आणि नंतर वसुलीसाठी जाच करणाऱ्या सावकाराला अटक करण्याची मागणी झाली होती. त्यानंतर आता हे दुसरे प्रकरण समोर आले आहे.
नेमके प्रकरण काय?
दिंडोरी येथील सागर रामचंद्र वसाळ या तरुणाला भामट्यांनी ऑनलाईन रौलेट बिंगो जुगाराचा नाद लावला. त्यातून ती श्रीमंत होशील, असे आमिष दाखवले. सागरने त्यांच्यामुळे जुगार खेळायला सुरुवात केली. मात्र, त्यात तो हरला. त्याचे पैसे गेले. त्यामुळे त्याने आता जुगार खेळायचा नाही, असा निर्धार केला. मात्र, भामट्यांनी त्याला जुगार खेळायची जबरदस्ती केली. त्यासाठी उसणे पैसे दिले. त्यानंतरही सागर जुगारात हरला. त्याने जुगार खेळणार नाही, असा निर्धार केला. मात्र, त्याला जुगार खेळ अन्यथा आमचे पैसे जे असा तगादा लावण्यात आला. त्याला धमकी देण्यात आली. यप्रकरणी कैलास शहा, कुमार त्र्यंबक जाधव, अकिल शेख, सचिन रमेश बागुल यांच्याविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, कैलास शहा हा फरार आहे.
कशी आहे साखळी?
रौलेट बिंगो हा ऑनलाईन जुगार आहे. या जुगारात अनेकजण पैसे गुंतवतात. निराश होतात. आणि पुन्हा टोकाचे पाऊल उचलतात. अंजनेरी येथे यापूर्वी या जुगारातून कर्जबाजारी झाल्यामुळे एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केली आहे. खासगी सावकार जुगाराच्या नादी लागलेले असे तरुण हेरतात. त्यांना अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज देतात. हे कर्ज वसुलीकरण्यासाठी पुन्हा जाच सुरू करतात. जमिनीवर जप्ती आणतात. त्यामुळे आपण आयुष्यात सारेच गमावले, या भावनेतून युवक नैराश्यग्रस्त होत आत्महत्या करतात. त्यामुळे या हा जुगार बंद करावा. खासगी सावकारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!