Nashik | विद्यार्थ्यानेच संपवले शिक्षिकेचे कुटुंब; दुहेरी हत्याकांडातले मृतदेह फेकले जॉन अब्राहमच्या कारमधून

| Updated on: Feb 19, 2022 | 9:34 AM

माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा डॉक्टर मुलगा अमित कापडणीस यांच्या मृतदेहांची 'डीएनए' तपासणी होणार आहे. त्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलीच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत. हे दोन्ही मृतदेह मोखाडा आणि राजू पोलिसांनी ओळख न पटल्याने पुरले होते. आता ते बाहेर काढून पुढील कारवाई केली जाणार आहे.

Nashik | विद्यार्थ्यानेच संपवले शिक्षिकेचे कुटुंब; दुहेरी हत्याकांडातले मृतदेह फेकले जॉन अब्राहमच्या कारमधून
डावीकडून नानासाहेब कापडणीस, अमित कापडणीस आणि आरोपी राहुल जगताप.
Follow us on

नाशिकः नाशिकमधील (Nashik) यशंवतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा डॉक्टर मुलगा अमित कापडणीस यांच्या खुनाप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. कापडणीस पिता-पुत्रांचा संशयित राहुल जगतापने अतिशय निर्घृण खून (Murder) केला. त्यांना शहराबाहेर नेत संपवले. त्यांचे मृतदेह जाळून दरीत फेकले. या प्रकरणातील मुख्य संशयित राहुल हा कापडणीस यांच्या पत्नीचा विद्यार्थी असल्याचे तपासात समोर आलेय. श्रीमती कापडणीस या ओझर येथील एका खासगी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होत्या. याच शाळेत राहुल याने पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. एकूण पाच वर्षे तो त्यांच्या हाताखाली शिकला. या ओळखीचा फायदा घेतच तो कापडणीस पिता-पुत्रांच्या घरात शिरला. त्यातून त्यांच्याशी संबंध वाढवले आणि त्यांचा काटा काढल्याचे पोलीस (Police) तपासात समोर आले आहे.

नेमके प्रकरण काय?

नाशिक येथील शरणापूर रोडवरील आनंदी गोपाळ पार्कमध्ये माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचे पुत्र डॉक्टर अमित कापडणीस रहायचे. मात्र, ते प्रॅक्टीस करायचे नाहीत. अमित यांच्यासोबत आनंदी गोपाळ पार्कमधील हॉटेल व्यावसायिक राहुल जगतापने मैत्री केली. त्याच्यासाठी आपण तुमच्या आईचे विद्यार्थी असल्याचे सांगितले. डिसेंबरमध्ये नानासाहेब कापडणीस यांना गुंगीचे औषध देऊन शहराबाहेर नेले. पालघर जिल्ह्यातील मोखाडा घाटात त्यांचा गळा आवळून खून केला. मृतदेह दरीत फेकला. तर अमितला भंडारदरा येथे फिरण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने शहराबाहेर नेत त्याचाही खून केला. त्याचा मृतदेह वाकी घाटात जाळून फेकला. हे दोन्ही मृतदेह संबंधित भागातील पोलिसांना सापडले. मात्र, त्या दरम्यान जवळच्या पोलीस ठाण्यात कुठेही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली नव्हती. त्यामुळे तपास रखडला. शेवटी कापडणीस यांची मुलगी शीतले वडील-भाऊ बेपत्ता असल्याची सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या खुनाला वाचा फुटली.

संपत्ती पाहून डोळे फिरले

कापडणीस कुटुंबाची नाशिकमध्ये प्रचंड जायदाद आहे. ही संपत्ती पाहून राहुलचे डोळे दीपावले. त्यातूनच त्याने कापडणीस पिता-पुत्राच्या खुनाचा कट रचला. कापडणीस यांचे पंडित कॉलनीमध्ये चार प्लॅट, सावरकरनगरमध्ये दोन मोठे बंगले, 97 लाखांचे शेअर्स ट्रेडिंग, 20 लाखांची मुदतपूर्ण ठेव, 30 लाखांची मुदतपूर्ण ठेव, देवळाली कॅम्पमध्ये टोलेजंग रो-हाऊस, नानावलीत 14 लाखांचा गाळा आहे. इतरही त्यांची अमाप संपत्ती आहे. शिवाय कापडणीस पिता-पुत्र दोघेच नाशिकला राहायचे. त्यांची पत्नी व मुलगी मुंबईला राहायच्या. याचाच फायदा संशयिताने उठवला. त्यांचा खून करून यांच्या खात्यावरील मोठी रक्कम आरटीजीएसद्वारे आपल्या खात्यावर वर्ग केली. कापडणीस यांच्या खात्यातून शेअर्स विकत पैसे काढले. या आधारे पोलिसांनी राहुल जगतापला बेड्या ठोकल्या.

जॉन अब्राहमची कार

संशयित राहुल जगतापने मृतदेहांची विल्हेवाट लावल्याची सिनेअभिनेता जॉन अब्राहमची कार वापरल्याचे म्हटले आहे. ही रेंज रोव्हर कार त्याने गोवा येथून आणल्याचे तपासात समोर आलेय. त्यावर नाशिकचा बनावट नंबर लावला. राहुलने ही कार आपण मुंबईत एका एजंटकडून खेरदी केल्याचे म्हटले आहे. शिवाय ही कार अभिनेता जॉन अब्राहमचे असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

‘डीएनए’ तपासणी होणार

माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा डॉक्टर मुलगा अमित कापडणीस यांच्या मृतदेहांची ‘डीएनए’ तपासणी होणार आहे. त्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलीच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत. हे दोन्ही मृतदेह मोखाडा आणि राजू पोलिसांनी ओळख न पटल्याने पुरले होते. आता ते बाहेर काढून पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यातून हे मृतदेह त्यांचेच होते, याची पुष्टी होईल. त्यामुळे कोर्टातही आरोप सिद्ध होण्यासाठी मदत होणार आहे.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!