आधी मुलांना विष देऊन मारलं, नंतर बिल्डींगवरून उडी मारून आईनेही आयुष्य संपवलं; नाशिकमधील घटनेने खळबळ

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे एका 30 वर्षांच्या महिलेने तिच्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवलं. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे आत्महत्या करणआऱ्या या महिलेची दोन मुलदेखील घरात मृतावस्थेत आढळली. या मृत महिलेने आयुष्य  संपवण्यापूर्वी एका व्हिडिओद्वारे मेसेज शेअर केला

आधी मुलांना विष देऊन मारलं, नंतर बिल्डींगवरून उडी मारून आईनेही आयुष्य संपवलं; नाशिकमधील घटनेने खळबळ
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 1:23 PM

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे एका 30 वर्षांच्या महिलेने तिच्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवलं. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे आत्महत्या करणआऱ्या या महिलेची दोन मुलदेखील घरात मृतावस्थेत आढळली. या मृत महिलेने आयुष्य  संपवण्यापूर्वी एका व्हिडिओद्वारे मेसेज शेअर केला होता, ज्यामध्ये तिने तिच्या पतीवर अनेक आरोप करत त्याला दोष दिला होता. आई आणि मुलांच्या या तिहेरी मृत्यूमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेने शहरातील कोणार्क नगर भागात असलेल्या हरिवंदन अपार्टमेंटच्या छतावरून उडी मारली. आत्महत्येपूर्वी या महिलेने तिच्या 8 वर्षांच्या मुलीला आणि 2 वर्षांच्या मुलाला विष पाजले असावे, असा पोलिसांना संशय आहे. ती महिला खाली कोसळल्यानंतर तेथे राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली.

पतीवर केले अनेक आरोप

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या मृत महिलेच्या घरी पोहोचून तपासणी केली असता घरात तिची दोन मुले मृतावस्थेत आढळून आली. तर मृत महिलेचा पती घराबाहेर होता. पोलिसांनी मृत महिलेने लिहिलेली एक चिठ्ठी जप्त केली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या पतीवर छळ केल्याचा आरोप केला आहे.

आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी या महिलेने एक व्हिडिओ मेसेजही रेकॉर्ड केला. पतीने आपल्याला हे जीवघेणे पाऊल उचलण्यास भाग पाडले, असा आरोप तिने या व्हिडीओमध्ये केला. महिलेने ही क्लिप तिच्या नातेवाईकांसोबत शेअर केली आहे. मृत महिलेचा पती हा कामानिमित्त पुण्यात होता, त्याला तपासात सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.