डोळ्यांत मिरची पूड फेकली, 10-12 जणांनी चढवला हल्ला, तरूणाचा थेट जीवच घेतला ! कारण काय तर…

नाशिकमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर 10-12 जणांनी तरूणाला घेरून त्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे.

डोळ्यांत मिरची पूड फेकली, 10-12 जणांनी चढवला हल्ला, तरूणाचा थेट जीवच घेतला ! कारण काय तर...
क्राईम न्यूज
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 11:54 AM

नाशिकमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर 10-12 जणांनी तरूणाला घेरून त्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही भयानक घटना घडली. विशांत भोये असं मृत तरूणाचं नाव असून तो 29 वर्षांचा होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पंचवटीमध्ये हा खून झाला. तेथे मृत विशांत हा त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. तेवढ्यात तेथे 10-12 जणांचं टोळकं आलं. त्यांनी अचानक विशांत आणि त्याच्या मित्रांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. आणि त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. यातील एका तरूणाने तर विशांतर थेट कोयत्याने हल्ला केला आणि ते पळून गेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला विशाल रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्याला त्याच्या मित्रांनी उपचारांकरिता तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र घाव वर्मी लागल्याने रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. विशांतच हल्लेखोरांनी काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याच वादातून या टोळक्याने हा हल्ला करत त्याची खून केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.