Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हरवलेली 10 वर्षांची चिमुरडी रात्री उशिरा घरी परतली! घरी आल्यानंतर कळलं की तिच्यावर बलात्कार झालाय

Nashik Rape :दहा वर्षांच्या मुलीनं (10 year old minor girl rape) सांगितलेला प्रकार ऐकून तिच्या आईवडिलांसह पोलिसही हादरुन गेले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आता पॉक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.

हरवलेली 10 वर्षांची चिमुरडी रात्री उशिरा घरी परतली! घरी आल्यानंतर कळलं की तिच्यावर बलात्कार झालाय
सांकेतिक फोटो Image Credit source: social
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 11:28 PM

नाशिक : नाशकातून (Nashik City) एक खळबळजनक घटना समोर येते आहे. नाशकातील एक दहा वर्षांच्या मुलीचं अपहरण झालं होतं. ही मुलगी अखेर रात्री उशिरा सापडली होती. त्यानंतर या मुलीनं आपल्या आईवडिलांना आपल्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितलं. या दहा वर्षांच्या मुलीनं (10 year old minor girl rape) सांगितलेला प्रकार ऐकून तिच्या आईवडिलांसह पोलिसही हादरुन गेले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आता पॉक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला असून एक संशयितालाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये धडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी ही शुक्रवारी रात्री उशिरा बेपत्ता झाली होती. मुलगी हरवल्यामुळे तत्काळ पोलिसांतही तक्रार दिली होती. मात्र रात्री उशिरा ही मुलगी परतली आणि त्यानंतर सगळ्यांच्याच जीवात जीव आला होता. दरम्यान, घरी परतल्यानंतर मुलीनं जे काही सांगितलंय, त्यानं सगळेच हादरून गेलेत.

अशी कशी काय हरवली?

10 वर्षांची मुलगी आपल्या वडिलांसबोत रात्री फेरफटका मारायला घराबाहेर पडली होती. त्यावेळी आपल्या घरातील पाळीव कुत्राही त्यांच्यासोबत होता. फेरफटका मारुन परततेवेळी या मुलीनं आपल्या बाबांचा हात सोडला आणि ती घराच्या दिशेनं पळू लागली. काही वेळानंतर वडीलही घरी आले. मात्र मुलगी घरी नाहीच, हे कळल्यानंतर शोधाशोध सुरु झाली.

यानंतर पोलिसांनाही याबाबत कळवण्यात आलं. पोलिसांनीही श्वान पथकाच्या माध्यमातून मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मुलगी हरवली आहे, हे कळल्यानंतर आई- वडील या दोघांचा जीव कासवीस झाला होता. अखेर रात्री उशिरा दीडच्या सुमारास या मुलीला शोध लागला. कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं या मुलीला घरी आणूस सोडलं होतं.

..आणि आई-वडील हादरले!

मुलगी घरी परतल्यानंतर आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. पण त्यानंतर या मुलीनं आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितल्यानंतर या अपहरण प्रकरणाला अत्याचाराचं वळण लागलं. याप्रकरणी आता पोलिसांमध्येही तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. मात्र या नाशिकमधील या वाढत्या गंभीर गुन्ह्याच्या प्रकारांनी पोलिसांना धाक शहरात उरलाय की नाही, असा सवालही उपस्थित झाला आहे.

संबंधित बातम्या :

Murder | फरशीनं वार, 16 वर्षांच्या तरुणाचा खून! परभणी हादरलं, का करण्यात आली निर्घृणपणे हत्या?

जंगलात दोन वाघांची झुंज, घडला हा भलताच प्रकार, दोघांच्या झुंजीत…

Special Report | Karnatakaनंतर पश्चिम बंगालमध्ये हिजाबवरुन वाद – tv9

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.