Nashik Lightning : इगतपुरीत शेतकरी दाम्पत्याचा वीज कोसळून मृत्यू, चार जण गंभीर जखमी

घटनेची माहिती समजताच तलाठी यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हे सर्व जण इगतपुरी तालुक्यातील मालुंजेवाडी येथील रहिवासी असून पिंपळगाव घाडगा येथे लग्नासाठी गेले होते.

Nashik Lightning : इगतपुरीत शेतकरी दाम्पत्याचा वीज कोसळून मृत्यू, चार जण गंभीर जखमी
इगतपुरीत शेतकरी दाम्पत्याचा वीज कोसळून मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 1:13 AM

नाशिक : वीज कोसळल्याने शेतकरी आदिवासी दाम्पत्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे. अन्य चार जण गंभीर जखमी (Injured) झाले आहे. जखमींना उपचारासाठी एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच तलाठी यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हे सर्व जण इगतपुरी तालुक्यातील मालुंजेवाडी येथील रहिवासी असून पिंपळगाव घाडगा येथे लग्नासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना अचानक जोरदार वादळी वारा व वीजांचा कडकडाट सुरू झाल्यामुळे ते झाडाखाली थांबले असताना ही दुर्घटना घडली. (A farmer couple was killed and four others were seriously injured in a lightning strike in Igatpuri)

लग्न समारंभाहून घरी परतत असताना घडली दुर्घटना

दशरथ दामू लोते (35), सुनिता दशरथ लोते (30) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात बुधवारी सकाळपासून पावसाचे सावट दिसून येत होते. हे दाम्पत्य इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना अचानक जोरदार वारे वाहू लागले. वीजांचाही कडकडाट सुरू झाल्यामुळे सदर दाम्पत्य व दोन मुली रस्त्यावरील एका झाडाखाली थांबले. यावेळी अचानक वीजेचा लोळ अंगावर येत सदर दाम्पत्य जागीच ठार झाले. तर तेजस्वी दशरथ लोते (7), सोनाली दशरथ लोते (5) यांच्यासह अन्य एक महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाले असून सदर जखमींना एसएमबीटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी वीज पडून ठार झालेल्या दाम्पत्याच्या व कुटुंबांना भरपाई देण्यात यावी तसेच जखमींना देखील शासकीय मदत करण्यात यावी अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी केली.

नैसर्गिक आपत्ती दरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक बदल होत असून नागरिकांनी सावधानता बाळगत वादळी वारे सुरू असताना वीजेच्या खांबाजवळ उभे राहू नये. तसेच झाडाखाली उभे राहू नये. वीजवाहक तारा यापासून दूर उभे राहावे. त्याचप्रमाणे मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवावा. तसेच घरातील वीज उपकरणे बंद स्थितीतच ठेवावे. अशा सूचना शासनाच्या वतीने देण्यात आल्या असून ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (A farmer couple was killed and four others were seriously injured in a lightning strike in Igatpuri)

इतर बातम्या

Shocking : जेवणाच्या पैशांवरुन तुफान राडा, 17 जणांकडून जीवघेणा हल्ला! कामोठ्यातील धक्कादायक घटना

अनिल देशमुखांची 11 एप्रिलपर्यंत CBI कोठडीत रवानगी, चौकशी दिल्ली की मुंबईतच होणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.