Nashik Youth Killed : जुना वाद विकोपाला गेला, मध्यरात्री झालेल्या भांडणातून दोघांनी तरुणाचा काटा काढला !

संतोष जैस्वाल आणि निसाद हे दोघेही मूळचे आझमगडचे रहिवासी असून, कामानिमित्त नाशिकमध्ये राहतात. हत्येनंतर आरोपी पळून गेले आहेत. ते आझमगडला आपल्या गावी जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी एक पथक तयार केले आहे.

Nashik Youth Killed : जुना वाद विकोपाला गेला, मध्यरात्री झालेल्या भांडणातून दोघांनी तरुणाचा काटा काढला !
जुन्या वादातून नाशिकमध्ये तरुणाची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 5:06 PM

नाशिक / चैतन्य गायकवाड (प्रतिनिधी) : जुन्या वादातून एका तरुणाची जीवघेणा हल्ला करत हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. संतोष जैस्वाल असे हत्या झालेल्या 30 वर्षीय तरुणाचे नाव आहे. फेसबुक पोस्टवरुन मयत तरुण आणि आरोपींमध्ये वाद होता. याच वादातून सातपूर येथील गोरक्षनाथ रोड काश्मीरे मळा परिसरात आरोपींनी तरुणाला संपवले. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सातपूर पोलिसांनी एक पथक तयार केले आहे. मुन्ना निसाद आणि रामकृष्ण निसाद अशी हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

फेसबुक पोस्टवरुन सुरु होता वाद

मयत तरुण आणि आरोपी एकाच परिसरात राहत होते. अनेक दिवसांपासून फेसबुक पोस्टवरुन आरोपी आणि मयत तरुणामध्ये वाद सुरु होता. याच वादातून बुधवारी मध्यरात्री दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणातून निसादने संतोषच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला.

हल्ल्यात जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात नेले मात्र…

या हल्ल्यात संतोष गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर सातपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना

संतोष जैस्वाल आणि निसाद हे दोघेही मूळचे आझमगडचे रहिवासी असून, कामानिमित्त नाशिकमध्ये राहतात. हत्येनंतर आरोपी पळून गेले आहेत. ते आझमगडला आपल्या गावी जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी एक पथक तयार केले आहे.

नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पालकमंत्री दादा भुसे यांना विचारले असता, त्यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती दिली. नाशिकमधील पूर्ण गुन्हेगारी मोडून काढू, असे आश्वासन त्यांनी दिले.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.