नाशिकमध्ये जामिनावर सुटलेल्या आरोपीची निर्घृण हत्या

प्रवीण एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्याच्यावर पोलिसात गंभीर गुन्हे दाखल होते.

नाशिकमध्ये जामिनावर सुटलेल्या आरोपीची निर्घृण हत्या
मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 12:19 AM

नाशिक : काही दिवसांपूर्वी जामिनावरुन तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीचा अज्ञात व्यक्तींनी निर्घृण खून केल्याची घटना नाशिकमधील पंचवटी परिसरात घडली आहे. प्रवीण काकड असे मयत तरुणाचे नाव आहे. प्रवीण हा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

पंचवटी परिसरात म्हसरुळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आडगाव लिंक रोड वरील रोहिणी हॉटेलच्या जवळ आज तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. प्रवीण काकड हा तरुण मित्रांसोबत रोहिणी हॉटेलजवळ मद्यपान करत बसला होता. त्याचवेळी काही अज्ञात व्यक्तींनी तेथे येऊन धारदार हत्याराने प्रवीणवर वार केले. या हल्ल्यात प्रवीणचा जागीच मृत्यू झाला.

मयताची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती

प्रवीण एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्याच्यावर पोलिसात गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे पूर्ववैमनस्यातूनच हा खून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्याच्या मृतदेहाजवळ मद्याच्या बॉटल आढळून आल्या आहेत. मयत प्रवीणचे वडील नाशिक पोलीस खात्यात नोकरीला होते. काही दिवसांपूर्वीच वडील गणपत काकड पोलीस खात्यातून निवृत्त झाले होते. प्रवीणच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Accused released on bail brutally murdered in Nashik)

इतर बातम्या

मुंब्य्रात दोन दिवसात 16 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, दोन आरोपी अटकेत

मुंबईत अभिनेत्याची पत्नी हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत, बड्या उद्योगपतींकडून कोट्यवधी उकळले

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.