VIDEO : नाशिकमध्ये गुंडगिरी, भाजप नगरसेवकाच्या कार्यालयावर हल्ला, सीसीटीव्हीत घटना कैद

भाजप नगरसेवर विशाल संगमनेरे यांच्या कार्यालयावर टोळक्याने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Attack on BJP corporator Vishal Sangamner in Nashik)

VIDEO : नाशिकमध्ये गुंडगिरी, भाजप नगरसेवकाच्या कार्यालयावर हल्ला, सीसीटीव्हीत घटना कैद
भाजप नगरसेवकाच्या कार्यालयावर हल्ला, सीसीटीव्हीत घटना कैद
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 5:09 PM

नाशिक : भाजप नगरसेवर विशाल संगमनेरे यांच्या कार्यालयावर टोळक्याने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही शुक्रवारी (4 जून) रात्री घडल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण विशाल संगमनेरे यांच्या कार्यालयाचं मोठं नुकसान झालं आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली आहे. आरोपीने नगरसेवकास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे (Attack on BJP corporator Vishal Sangamner in Nashik).

नगरसेवकाच्या जेलरोड येथील कार्यालयावर हल्ला

विशाल संगमनेरे हे प्रभाग 18 चे नगरसेवक आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. राजकारणात काम करत असताना अनेक शत्रू देखील निर्माण होतात. राजकीय नेत्याच्या कार्यालयावर हल्ल्याची ही पहिली घटना नाही. याआधी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. विशाल संगमनेरे यांच्या जेलरोड येथील संपर्क कार्यालयावर हल्ल्याची अशीच एक घटना घडली. आरोपींनी लाठ्या-काठ्यांनी कार्यालयाची नासधूस केली. आरोपींनी नगरसेवकास शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संबंधित घटनेचा सीसीटीव्ह फुटेजही समोर आला आहे (Attack on BJP corporator Vishal Sangamner in Nashik).

सीसीटीव्हीत नेमकं काय?

आरोपी चार ते पाच बाईक घेऊन विशाल संगमनेरे यांच्या कार्यालयाजवळ आले. यावेळी रस्त्याने नागरिकांच्या वाहनांची ये-जा सुरु होती. आरोपींच्या हातात लाठ्या-काठ्या होत्या. त्यांनी शिवीगाळ करत नगरसेवकाच्या कार्यालयावर हल्ला केला. त्यांनी कार्यालयाची नासधूस केली. ते प्रचंड वेगाने आले. त्यांनी नासधूस केली आणि तितक्याच वेगाने ते बाईकवर पळूनही गेले. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

हल्ला नेमका कुणी केला?

संबंधित घटनेमागे नेमका कोणाचा हात आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. याशिवाय आरोपींना हा हल्ला नेमका का केला? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी काही जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एका आरोपीवर याआधी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस याबाबत तपास करुन लवकरच सविस्तर माहिती जाहीर करणार आहेत.

हल्ल्याचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा : वाढदिवसाच्या दिवशी विश्वासघात ! जंगलात नेऊन बलात्कार, प्रियकराने असं का केलं? तरुणीला हुंदका

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.