Nashik Accident : दैव बलवत्तर म्हणून अपघातातून 5 शिक्षक बचावले, कंटेनरखाली कार घुसल्याने झाला अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा वाडीवऱ्हेजवळ ब्रेक फेल झाला. अचानक थांबण्यासाठी कंटेनरचालक प्रयत्न करीत होता. त्याला वेगवान कंटेनर थांवण्यात यश आले. मात्र पाठीमागून येणारी कार कंटेनर अचानक थांबल्याने भरधावपणे कंटेनरच्या खाली घुसली.

Nashik Accident : दैव बलवत्तर म्हणून अपघातातून 5 शिक्षक बचावले, कंटेनरखाली कार घुसल्याने झाला अपघात
कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 8:23 PM

नाशिक : वाडीवऱ्हेजवळ ब्रेक फेल झाल्याने अचानक जागेवर थांबलेल्या कंटेनर (Container)च्या मागून येणारी कार (Car) थेट कंटेनरच्या खाली घुसली. त्यामुळे मोठा अपघात झाला. मात्र दैव बलवत्तर असल्याने कारमध्ये प्रवास करणारे 5 शिक्षक बचावले. मुंढेगावाजवळ झालेल्या शिक्षकांच्या अपघाताचा थरकाप ताजा असतानाच हा अपघात झाल्याने सर्वांना धसका बसला. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने कंटेनर चालकाने अचानक वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. यात त्याला यशही आले. मात्र मागून येणाऱ्या कार चालकाला काही कळायच्या आत त्यांची गाडी कंटेनरखाली घुसली. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल झाले. तथापि सर्वांना सुखरूप पाहून त्यांनी घाबरलेल्या शिक्षकांना धीर दिला. (Container and car accident in Nashik, fortunately no casualties)

कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने घडला अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा वाडीवऱ्हेजवळ ब्रेक फेल झाला. अचानक थांबण्यासाठी कंटेनरचालक प्रयत्न करीत होता. त्याला वेगवान कंटेनर थांवण्यात यश आले. मात्र पाठीमागून येणारी कार कंटेनर अचानक थांबल्याने भरधावपणे कंटेनरच्या खाली घुसली. कारमध्ये वाडीवऱ्हे येथील माध्यमिक विद्यालयात कार्यरत असणारे 5 माध्यमिक शिक्षक होते. दैव बलवत्तर असल्याने कोणालाही काही इजा न होता सर्वांचा प्राण बचावला आहे. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने मदतकार्य केले. अडकलेल्या शिक्षकांना बाहेर काढण्यात आले. घाबरून गेलेल्या शिक्षकांना रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी दिलासा दिला. मुंढेगाव जवळील अपघातात शिक्षकांना प्राण गमवावा लागल्याची घटना ताजी असताना हा अपघात झाल्याने धसका बसला.

भोर वरंधा घाटात पीकअप टेम्पो अपघात

शालेय पोषण आहार घेऊन चाललेल्या पीकअप गाडीचा भोर – महाड मार्गावरील हिरडोशी गावाजवळ अपघात झाला. या अपघातात गाडीतील दोघं जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात गाडीचे आणि गाडीतल्या पोषण आहाराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. घाट मार्गावरील तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते. (Container and car accident in Nashik, fortunately no casualties)

इतर बातम्या

Iqbal Kaskar : दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ईडीकडून अटक

Ahmedabad Serial Blast: देशात पहिल्यांदाच 38 जणांना फाशी, आरोपींची नावे वाचा एका क्लिकवर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.