लासलगावमध्ये अॅपे रिक्षा-हायवामध्ये अपघात, पाच जण जागीच ठार

ही अॅपे रिक्षा विंचूरहून लासलगावच्या दिशेने चालली होती. यावेळी हायवाने अॅपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचा चक्काचूर केला. या अपघातात पाच जणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

लासलगावमध्ये अॅपे रिक्षा-हायवामध्ये अपघात, पाच जण जागीच ठार
लासलगावमध्ये अॅपे रिक्षा-हायवामध्ये अपघात
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 9:27 PM

लासलगाव : अॅपे रिक्षा-हायवा गाडीत समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात अॅपे रिक्षातील पाच जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. लासलगाव विंचूर रोडवरील मंजुळा पॅलेसजवळ हा अपघात झाला. यातील दोन प्रवाशी लोणी प्रवरा येथून लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे भाऊसाहेब पठारे यांच्याकडे अंतविधीसाठी सकाळी आले होते. अंत्यविधी कार्यक्रम आटपून आपल्या गावी जाण्यासाठी ते विंचूरला रिक्षाने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. (Five killed on Ape rickshaw-highway accident in Lasalgaon)

विंचूरहून लासलगावच्या दिशेने चालली होती अॅपे रिक्षा

आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लासलगावहून विंचूरच्या दिशेने निघालेली ॲपे रिक्षा क्रमांक MH.15.Y.4461 मध्ये रिक्षा चालकासह पाच जण प्रवास करत होते. ही अॅपे रिक्षा विंचूरहून लासलगावच्या दिशेने चालली होती. यावेळी हायवाने अॅपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचा चक्काचूर केला. या अपघातात पाच जणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. मृतांमध्ये सुहास मनोहर निकाळे (40) विंचूर रिक्षा चालक, विठ्ठल बाजीराव भापकर (65) लोणी प्रवरा, भाऊसाहेब बाळासाहेब नागरे (60) लोणी प्रवरा, किसनदास बैरागी (60) धारणगाव खडक, रतन गांगुर्डे (40) इंदिरा नगर विंचूर यांचा समावेश आहे.

लासलगाव-येवला रोडवर दोन मोटरसायकलच्या अपघातात एक ठार

दोन मोटार सायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. लासलगाव-येवला मार्गवरील निफाड तालुक्यातील वेळापूर येथे रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात येवला तालुक्यातील कासारखेडे येथील राजेंद्र भिका वाघ (27) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील कृष्णा पठाडे (25) व त्याचा मित्र अकबर इनामदार (32) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी युवक राहता तालुक्यातील ममदापूर येथील रहिवासी आहेत. जखमी युवक मोटारसायकलवरुन पाटोदा बाजूने लासलगावकडे जात होते. यावेळी हा अपघात झाला. जखमी युवकांवर सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. (Five killed on Ape rickshaw-highway accident in Lasalgaon)

इतर बातम्या

आधी 3 गुणांनी संधी हुकली, आता 466 रँक, कोणताही क्लास न लावता यवतमाळच्या श्रीकांत मोडकने करुन दाखवलं !

कमळवाला आणि कमला, भातखळकरांच्या ट्विटनं भुवया उंचावल्या, नेटकरी म्हणतात, Tweet Of The Day

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.