Igatpuri : बनावट ग्राहक बनून तस्करांना रंगेहाथ पकडलं! पण मग हवेत गोळीबार करण्याची वेळ का आली? आंबोली घाटात थरारनाट्य

त्र्यंबकेश्वरजवळील आंबोली फाट्यावर तस्करी करताना चौघांना रंथेहाथ पकडण्यात आलं. पण आपण पकडले जातोय, हे पाहून तस्करांनी वनविभागाच्या पथकावर दगडफेक केली. यावेळी झालेल्या झटापट आणि मारहाणी वनविभागाचे दोन ते तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले.

Igatpuri : बनावट ग्राहक बनून तस्करांना रंगेहाथ पकडलं! पण मग हवेत गोळीबार करण्याची वेळ का आली? आंबोली घाटात थरारनाट्य
चौघांना सिनेस्टाईल अटकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 7:41 AM

नाशिक : बिबट्याच्या (Leopard) कातडीची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. सिनेस्टाईल (Cine Style) झटापटीनंतर अखेर 4 जणांना बेड्या (Arrest) ठोकण्यात आल्या आहेत. बनावट ग्राहक बनून जात तस्करांना वनविभागाने रंगेहाथ पकडलं. यावेळी थरारक घटापट झाली होती. पण अखेर हवेत गोळीबार करत तस्करांच्या मुसक्या आवळल्यात. आता अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची कसून चौकशी केली जातेय. इगतपुरीच्या वन पथकाने ही कारवाई केली. प्रकाश लक्ष्मण राऊत, परशुमार चौधरी, यशवंत मौळी, हेतू मौळी अशी अटक करण्यात आलेल्या चौघा संशयित आरोपींची नावे आहेत.

इगतपुरी वन खात्यातील पथकाला बिबट्याच्या कातडीची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरी वनविभाग पथकाने सापळा रचला. जव्हार मोखाडा रस्त्यावीरल आंबोली फाट्यावर सोमवारी दुपारी वनअधिकारी आणि कर्मचारी तस्करांना पकडण्याच्या तयारीत होते. ठरल्याप्रमाणे तस्करांना पकडण्यात आलं. पण त्याआधी थरारक झटापट झाली.

असा रचला सापळा!

हिंदीभाषिक ग्राहक असल्यानं वन अधिकाऱ्यांनी तस्करांना भासवलं होतं. त्यानंतर कातडी देण्यासाठी तस्करांनी बनावट ग्राहक बनलेल्या वन विभागाच्या पथकाला आधी घोटीमध्ये बोलावलं. पण नंतर पत्ता बदलला आणि त्यांना त्र्यबकेश्वर इथं यायला सांगितलं.

हे सुद्धा वाचा

त्र्यंबकेश्वरजवळील आंबोली फाट्यावर तस्करी करताना चौघांना रंथेहाथ पकडण्यात आलं. पण आपण पकडले जातोय, हे पाहून तस्करांनी वनविभागाच्या पथकावर दगडफेक केली. यावेळी झालेल्या झटापट आणि मारहाणीमध्ये वनविभागाचे दोन ते तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले.

पाहा LIVE घडामोडी : Video

कागदांची भरलेली कॅशची बॅग

अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हवेत गोळीबार केला आणि चारही तस्करांच्या मुसक्या आवळल्या. एका काळ्या बॅगमध्ये कागदाचे बंडल भरुन नोटा असल्याचंही भासवण्यात आलं होतं. चौघांपैकी एकाने बँगेला हात लावून त्यात कॅश आहे की नाही, ते तपासलं होतं. त्यानंतर हातवारे करत बिबट्याची कातडी आणण्याच्या सूचना केल्या होत्या होत्या. यानंतर ही थरारक झटापट झाली आणि चौघांना अटक करण्यात आली. आता या चारही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.