वाद, मारहाणीनंतर गळा चिरला, मग मृतदेह जाळला! इगतपुरीतील संशयास्पद मृतदेहाच्या हत्येचं गूढ उकललं

Igatpuri Crime News : हत्याकांड प्रकरणाच्या गुन्हयातील आरोपी रामेश्वर उर्फ राम मोतीराम गर्दे, सलमान उर्फ माम्या वजीर खान, सदाशिव उर्फ शिव पाराजी गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे

वाद, मारहाणीनंतर गळा चिरला, मग मृतदेह जाळला! इगतपुरीतील संशयास्पद मृतदेहाच्या हत्येचं गूढ उकललं
धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 6:46 AM

इगतपुरी : 26 एप्रिलला इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणाजवळ धारगाव (Dhargaon Dead Body) शिवारात एक 20 ते 30 वर्षीय पुरूषाचा अर्धवट जळालेला मृतदेह मिळून आला होता. मयत इसमाला कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणासाठी गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने गंभीर जखम करून जिवे ठार (Igatpuri Murder News) मारले. त्याचे प्रेत कोणाला दिसू नये म्हणून त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी वैतरणा धरणाजवळ जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला फेकून देण्यात आले. सफेद रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोण्या मृतदेहावर टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ह्या घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा (Nashik Police) पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तात्काळ दखल घेवून गुन्हयातील मयताची ओळख पटविण्यासाठी नाशिक शहर व लगतच्या जिल्ह्यातील हरवलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याबाबत पोलीस पथकास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मयत इसमाच्या फोटोवरून खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, मयत इसम हा मुजाहिद उर्फ गोल्डन अफजल खान, वय 23, रा. भारतनगर, वडाळा रोड, नाशिक असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे घोटी पोलीसांनी मयत इसमाबाबत सविस्तर माहिती घेतली.

मारेकऱ्यांना अटक

अफजल खान हा 25 एप्रिलपासून त्याच्या काही साथीदारांसोबत एका कारमध्ये गेलेला असल्याचे समजले. त्यावरून पोलीस पथकाने नाशिक शहरातील संशयीत आरोपी रामेश्वर उर्फ राम मोतीराम गर्दे, वय 30, रा. स्नेह संकुल, अशोका मार्ग, नाशिक, सलमान उर्फ माम्या वजीर खान, रा. वडाळागाव, नाशिक, सदाशिव उर्फ शिव पाराजी गायकवाड, रा. वडाळागाव, म्हाडा कॉलनी, नाशिक यांना ताब्यात घेतले.

हत्येचं गूढ उकललं!

ताब्यात घेतलेले इसमांना विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे आणखी एक साथीदारासह मयत इसम यास त्यांचेकडील स्कोडा सुपर्ब कार क्र. एम. एच. 06. ए. व्ही. 3344 या वाहनात बसवून मुंबई आग्रा महामार्गावर मुंढेगाव शिवारात घेऊन गेला होता. तिथे त्यांचे आपसात वाद झाले. यानंतर यातील आरोपींनी मयताचे हातपाय धरून धारदार चाकूने मयताचे गळयावर आणि अंगावर वार करून त्याला जिवे ठार मारलं. नंतर मयताचं प्रेत कोणास दिसू नये म्हणुन वैतरणा धरणाच्या बॅक वॉटर परिसरात घेऊन जाऊन सफेद रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोण्या आणि पेट्रोल मृतदेहावर टाकून पेटवून दिले. आरोपींनी या हत्येची पोलीस तपासात कबुलीही दिली आहे.

हे सुद्धा वाचा

गंभीर गुन्हे

सदर गुन्हयातील आरोपी रामेश्वर उर्फ राम मोतीराम गर्दे, सलमान उर्फ माम्या वजीर खान, सदाशिव उर्फ शिव पाराजी गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 9 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली स्कोडा सुपर्ब कार क्र.एम. एच. 06. ए. व्ही. 3344 ही जप्त करण्यात आली आहे. या हत्याप्रकरणातील आणखी एक आरोपी हा फरार असुन पोलीस त्याचा शोध घेतायत. यातील आरोपी हे नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सचिन पाटील यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे घोटी पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. दिलीप खेडकर हे सदर गुन्हयाचा पुढील तपास करीत आहे. वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. दिलीप खेडकर, पोहवा शितल गायकवाड, पोना संतोष दोंदे, पोकॉ योगेश यंदे यांचे पथकाने सदर गुन्हयातील मयताची ओळख पटवून खुनाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

पाहा व्हिडीओ :

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.