Nashik Crime : पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला, दोन दिवसातील दुसरी हत्या

| Updated on: Aug 18, 2023 | 10:21 AM

नाशिकमध्ये हत्येचे सत्र थांबतच नाहीय. पूर्ववैमनस्यातून भररस्त्यात हत्येचे प्रकार वाढत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसात घडलेल्या दोन घटनांनी नागरिक हादरुन गेले आहेत.

Nashik Crime : पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला, दोन दिवसातील दुसरी हत्या
जुन्या वादातून तरुणाची हत्या
Image Credit source: socialmedia
Follow us on

चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नाशिक / 18 ऑगस्ट 2023 : नाशिकमध्ये हत्येचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. पूर्ववैमनस्यातून आणखी एका तरुणाच्या हत्येची घटना घडली आहे. मयुर दातीर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंबड येथील महालक्ष्मी नगर येथे ही घटना घडली. दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने आणि आर्थिक कारणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविचेछेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे. याप्रककरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

जुन्या वादाच्या रागातून तरुणाची हत्या

मयूरचा आरोपींसोबत पैशावरुन जुना वाद होता. याच वादातून टोळक्याने काल दुपारी महालक्ष्मी नगरमध्ये त्याला एकटे गाठले. यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस पथकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. करुण कडूस्कर, मुकेश मगर आणि रवी आहेर अशी आरोपींची नावे आहेत.

भरवस्तीत घडलेल्या घटनेने नागरिक भयभीत

पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. भरदिवसा भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र वाढत्या घटना पाहता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘अंकुश’ राहिला नसल्याची चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा