Jalgaon Suicide : ‘आत्महत्या करतोय! फॉलो करा, कमेंट करा, ओके बाय’ म्हणत जळगावमधील तरुणानं आयुष्य संपवलं!

| Updated on: Jul 16, 2022 | 10:46 AM

Jalgaon Suicide News : ही धक्कादायक घटना गुरुवारी घडली.

Jalgaon Suicide : आत्महत्या करतोय! फॉलो करा, कमेंट करा, ओके बाय म्हणत जळगावमधील तरुणानं आयुष्य संपवलं!
धक्कादायक...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

जळगाव : सोशल मीडियामध्ये (Social Media Video) व्हिडीओ अपलोड करुन आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) केलेल्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. आता पुन्हा तशीच घटना जळगावात (Jalgaon Crime News) घडली. या घटनेने सगळेच हादरलेत. एका छोटासा व्हिडीओ शेअर करत तरुणानं आपण आत्महत्या करतोय, अशी माहिती दिली. त्यानंतर गळफास घेत आपलं आयुष्य संपवलंय. ही धक्कादायक घटना गुरुवारी (14 जुलै) घडली. या घटनेनं जळगाव हादरुन गेलंय. हॅलो मित्रांनो, मी आज आत्महत्या करणार आहे, प्लीज मला फॉलो करा, कमेंट करा, ओके बाय, असं म्हणत तरुणानं आत्महत्या करण्याआधी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर या 22 वर्षीय तरुणाने गळफास घेतला आणि जीव दिला. घराच्या वरच्या मजल्यावर या तरुणाचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर घरातल्यांना मोठा धक्काच बसला होता.

आत्महत्या करणारा तरुण कोण?

धीरज शिवाजी काळे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. धीरज 22 वर्षांचा होता. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असायचा. जळगावच्या हरिविठ्ठल नगर इथं तो राहत होता. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यानं गळफास घेत आत्महत्या करत जीव दिला. नेमकी धीरजे आत्महत्या का केली? याबाबतचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. मात्र आत्महत्येआधी त्याने सोशल मीडियावर केलेल्या फोस्टचा आधार घेत अनेक अंदाज बांधले जात आहेत. धीरजच्या आत्महत्येचा आणि त्याने सोशल मीडियात केलेल्या पोस्ट्सचा एकमेकांशी काही संबंध आहे का? हे आता पडताळून पाहिलं जातं आहे.

कळलं कसं?

गुरुवारी सकाळपासून धीरज सामान्यपणे वागत होता. घराच्या वरच्या मजल्यावर असताना धीरजने गळफास लावून घेतला होता. वडील वरच्या मजल्यावर गेले असता मुलाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह पाहून त्यांना मोठा धक्काच बसला. सकाळपासून सामान्यपणे वागणाऱ्या धीरजने अचानक टोकाचं पाऊल का उचललं? या प्रश्नाचं उत्तर मिळू शकलेलं नाही.

हे सुद्धा वाचा

प्रेमप्रकरणातून आत्महत्या?

आत्महत्येआधी त्याने आपल्या मित्रांना आणि सोशल मीडियात आत्महत्या करत असल्याची माहिती शेअर केली होती. 9 सेकंदांचा व्हिडीओ त्यांना सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये धीरज ‘हॅलो गाईज, मी आज आत्महत्या करतोय, प्लीज मला फॉलो करा, कमेंट करा, ओके बाय, जय बाबा टकाटक’ असं म्हटलं होतं. प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय त्याने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टवरुन घेतला जातोय. रामानंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.